Attempt to terrorize Dhanori  sakal
पुणे

धानोरीत टोळक्याकडून पुन्हा हत्यारे घेऊन दहशत माजविण्याण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी : धानोरीतील मुंजाबा वस्ती येथे बुधवारी रात्री तरुणांच्या टोळक्याने हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली. टोळक्याने दुकानातील सामान, गाड्यांची तोडफोड केली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच तरुणांनी गेल्या आठवड्यात परिसरात दहशत पसरल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने पुन्हा एकदा बुधवारी रात्री तरुणांनी हत्यारे घेऊन दहशत माजविल्याने व्यापारी, तसेच रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या गुंडांना त्वरित अटक न केल्यास दुकाने बंद करून आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे. धुडगूस घालणाऱ्या दोन जणांना रात्री उशिरा विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Attempt to terrorize Dhanori )

अभी तांबे (१९, रा.मुंजाबा वस्ती), शुभम चिंचोरे (२०, कलवड) दहशत माजविणाऱ्या या दोघांना अटक केली असून अन्य आरोपींनादेखील लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी दिली. व्यापारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले की, मुंजाबा वस्ती येथे मागील शुक्रवारी (दि.14)रोजी रात्रीच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या टोळक्‍याने हातात शस्त्रे घेऊन परिसरात दहशत माजवली. मद्यधुंद अवस्थेत दारू पिउन दुकांनावर टपऱ्यांवर हल्ला केला. हे युवक येथील व्यापाऱ्यांकडे हफ्ते, खंडणी मागत असतात न दिल्यास त्यांना मारहाण करणे,धमकावणे,शालेय विद्यार्थिनींची महिलाची छेडछाड करणे,दुचाकींचे कर्णकर्कश्‍श्‍य आवाज करीत जोरात वाहने चालविणे असे प्रकार करीत आहेत.

विश्रांतवाडी पोलिसांनी यावर कोणतीच कारवाई केली नसल्याने, बुधवार (दि.१९) पुन्हा रात्री तरुणांच्या टोळक्याने हातात तलवार,कोयते, दांडके घेऊन काही दुकांनावर,दुचाकीवर दगडफेक केली. अनेक दिवसापासून वारंवार येथे असे प्रकार घडत असून याचे सीसीटीव्ही फुटेज असूनही या युवकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. युवकांना स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याने या युवकांची हत्यारे घेऊन दहशत माजविण्यापर्यंत मजल गेली असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT