RSA vs IND : कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही हाराकिरी | 2nd ODI Live Update Scorecard. Boland Park Stadium, Paarl 2nd ODI. India VS South Africa 2nd ODI News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs South Africa 2nd ODI Live News Updates
RSA vs IND Live: भारताचा फलंदाजीचा निर्णय

RSA vs IND : भारताची कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही हाराकिरी

पार्ल: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७ विकेट्सनी पराभव करत मालिकेत २ - ० अशी विजयी आघाडी घेतली. आफ्रिकेने कसोटी बरोबरच एकदिवसीय मालिकेवरही विजयी मोहर उमटवली. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठीचे भारताचे २८८ धावांचा लक्ष्य ४८ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आफ्रिकेकडून मलानने सर्वाधिक ९१ तर डिकॉकने ७८ धावांची खेळी केली. (India lost the ODI Series Against South Africa)

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ७ बाद २८७ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ८५ धावा केल्या. तर कर्णधार केएल राहुलने ५५ धावांची खेळी करुन त्याला साथ दिली. शार्दुल ठाकूरनेही फलंदाजीत आपले योगदान देत ४० धावांची खेळी केली. (Ind vs SA 2nd ODI Live Update)

भारताचे विजयासाठीचे २८८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरुवात केली. क्विंटन डिकॉक आणि यारामान मिलानने १३२ धावांची दमदार सलामी दिली. त्यानंतर शार्दुल ठाकूरने डिकॉकला ७८ धावांवर बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला.

मात्र त्यानंतर मलान आणि कर्णधार टेंम्बा बाऊमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचली. मात्र पहिल्यांदा जसप्रीत बुमराहने ९१ धावांवर खेळणाऱ्या मलानला आणि त्यानंतर पुढच्याच षटकात यझुवेंद्र चहलने बाऊमाला ३५ धावांवर बाद करत दोन्ही सेट फलंदाज बाद केले.

यानंतर दुसेन आणि मारक्रमने सावध फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. मारक्रम आणि दुसेन या दोघांनीही प्रत्येकी ३७ धावांची नाबाद खेळी केली.

(India vs South Africa 2nd ODI Live News Updates)

India vs South Africa 2nd ODI Live News Updates)

288-3 (48.1 Ov): दुसेन-माक्ररमची नाबाद ७४ धावांची भागीदारी, दक्षिण आफ्रिकेने २८८ धावांचे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात केले पार

214-3: बुमराह-चहलने मलान आणि बाऊमाला केले बाद, दोन्ही सेट फलंदाज गेले माघारी

196-1 : मलान शतकाच्या तर आफ्रिका द्विशतकाच्या जवळ

132-1: शार्दुल ठाकूरने जोडी फोडली, डिकॉक ७८ धावा करुन बाद

RSA 109/0 : आफ्रिकेचे सलामीवीर क्विंटन डिकॉक, जानेमन मलानची शतकी सलामी

 • RSA 69/0 : दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरूवात

 • 287-6 (50 Ov) : शार्दुल ठाकूरची ४० धावांची महत्वपूर्ण खेळी, भारताला पोहचवले सन्मानजनक धावसंख्येजवळ

 • 239-6 : भारताला सहावा धक्का, व्यंकटेश अय्यर २२ धावा करुन बाद

207-5 : श्रेयस अय्यर ११ धावांची भर घालून परतला

 • 183-4 पंतही शतकाविनाच परतला, शामसीने ८५ धावांवर केले बाद

 • 179-3 मगालाने जोडी फोडली, केएल राहुलची ५५ धावांची खेळी संपवली.

IND 134/2 (24.1) : ऋषभ पंतचे आक्रमक अर्धशतक

 • 64-2 : केशव महाराजचा भारताला पुन्हा मोठा धक्का, विराट कोहली शुन्यावर बाद

 • 63-1 : जोडी फुटली, शिखर धवन २९ धावा करुन बाद

IND 55-0 : शिखर धवन - केएल राहुलची अर्धशतकी सलामी

 • IND 42/0 (6) - सलमावीर शिखर धवन, केएल राहुल यांची आश्वासक सुरुवात

 • मार्को जेनसेनच्या जागी खेळणार सिसांदा

 • भारताने पहिल्या सामन्यातील संघच ठेवला कायम, दक्षिण आफ्रिका संघात एक बदल.

 • भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

Web Title: Rsa Vs Ind 2nd Odi Live Update Score Kl Rahul Virat Kohli Shreyas Iyer Jasprit Bumrah

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top