पुणे

लाॅकडाउननंतर पहिल्यांदाच परिंचेत वाजली शाळेची घंटा

संतोष जंगम

परिंचे : परिंचे (ता. पुरंदर) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात पहिल्याच दिवशी ४५ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. शासनाच्या आदेशानुसार सर्वतोपरी काळजी घेऊन शाळा सुरू केली असून, स्कुल कमिटीच्या वतीने मुलांचे स्वागत केले असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक महेश गोरेगावकर यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच वैशाली शेडगे, स्कुल कमिटी सदस्य सुनील शिंदे, मनीषा जाधव, सुप्रिया जाधव उपस्थित होते.

आठ महिने बंद असलेल्या शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला असून, सर्व वर्ग खोल्यांमध्ये सॅनिटाझर फवारणी करण्यात आली आहे. विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोवीड चाचणी केली असून, सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मुलांना हात धुण्यासाठी साबन व मुबलक पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्था मध्ये सहा फुटाचे अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था केली असून, विद्यार्थी शाळेत येताना मास्क लावने बंधनकारक आहे. प्रत्येक पालकांकडून हमीपत्र लिहून घेतले आहे. चार मुलांच्या वर मुलांना एकत्र येता येणार नाही. ९ वी १० वी चे वर्ग दिवसाआड भरवण्यात येणार असून ११ वी व १२वी चे वर्ग रोज भरवण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक महेश गोरेगावकर यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी गावात घर भेटी देऊन आरोग्य तपासणी केली होती. त्यामुळे आरोग्य तपासणीचा अनुभव आला आहे. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर ठेवून आरोग्य तपासणी केली जाते. रक्तातील ऑक्सिजन व शरिरातील तापमान तपासून सॅनिटायझरचा वापर करून वर्गात प्रवेश दिला जात असल्याचे शाळेतील शिक्षक राजेंद्र वाघोले यांनी सांगितले. यावेळी संजय धुमाळ, दत्तात्रय बनकर, शंतनु पवार, रश्मी गुजर, योगिनी शेवते, नलिनी शिंगोटे, आशा शिंदे आदी शिक्षक उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण ठरवा, ठाकरे गटाची मागणी

स्टार प्रवाहने केली एक दोन नाही तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा; २ कार्यक्रमही सोबतीला, ही आहेत नाव आणि कलाकार

Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Latest Marathi News Live Update : भूममध्ये पोलिसाचेच चार लाख पळवले

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

SCROLL FOR NEXT