esakal | 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant_Patil

राज्यातील पदवीधर विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक, राजकीय समीकरणे आणि पवार यांच्यावरील टिकेच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली.

'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना बोलता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या, मला चंपा म्हणता, हे चालते?'' अशी विचारणा करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत असे बोलायचे नसल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्यावरील टीकेबाबत सावरासावर केली.

'मी माझी बाजू मांडली. माझ्यासाठी हा विषय संपला,' तरीही त्यांना बोलायचे असेल, तर बोलू देत, असे सांगून पाटील यांनी टिकेच्या वादावर पडदा टाकला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागरिकांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, तेव्हा पवार यांच्यावरील टिकेवर बोलायला त्यांच्याकडे वेळ कसा, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थितीत केला.

Big Breaking: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत​

राज्यातील पदवीधर विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक, राजकीय समीकरणे आणि पवार यांच्यावरील टिकेच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "मला शरद पवार यांच्याबद्दल तसे काही बोलायचं नव्हते. मी ट्रोलिंगला घाबरत नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत बोलतो, पण तेव्हा शिवसेना काही बोलत नाही. राजकारणात हे सारे चालते. या सरकारमध्ये खूप गोंधळ आहे. कोणत्याही मुद्यांवर ते काम करीत नाहीत."

'रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा प्रकार'; चंद्रकांत पाटीलांची 'विनाशकाले विपरीत बुद्धी'​

मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशी हात मिळवणी करण्याचेच संकेत दिले. 'राज ठाकरे हे तळमळीने बोलत असतात. परप्रांतीय लोकांबाबतची आमची भूमिका त्यांना पटणार नाही. त्यांनी बदल केला पाहिजे. मनसेची भूमिका बदल्याशिवाय, त्यांच्या युती होऊ शकत नाही, असे सूचक विधानही पाटील यांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top