sakal
पुणे

इंदापूरात पहिल्याच दिवशी २८ हजार विद्यार्थ्यांची हजेरी

इंदापूर तालुक्यातील इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतच्या १५७ शाळा सुरु झाली असून, पहिल्याच दिवशी २८ हजार २९२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

राजकुमार थोरात

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतच्या १५७ शाळा सुरु झाली असून, पहिल्याच दिवशी २८ हजार २९२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कोरोना व लॉकडाउन नंतर आज सुमारे १८ महिन्यानंतर इयत्ता पाचवीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा सॅनिटायझरमध्ये फवारणी करण्यात आली होती.

अनेक महिन्यानंतर शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद गगणात मावेनासा झाला होता. शाळेच्या गेटवरती प्रवेश करताच मुला-मुलींचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना फुगे देण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या रक्तातील ऑक्सिजन व तपमान मोजण्यात आहे. वालचंदनगरमधील वर्धमान विद्यालयामध्ये शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

इंदापूरात पहिल्याच दिवशी ५३ टक्के हजेरी...

इंदापूर तालुक्यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या १५७ शाळा असून ५२८३९ विद्यार्थी आहेत. यातीन २८२९२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT