esakal | शेतकऱ्यांनी दिलेले सोयाबीन मुख्यमंत्र्यांना देणार भेट : फडणवीस | Devendra Fadanvis In Latur
sakal

बोलून बातमी शोधा

मदनसुरी (ता.निलंगा, जि.लातूर) :  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. असताना....

शेतकऱ्यांनी दिलेले सोयाबीन मुख्यमंत्र्यांना देणार भेट : फडणवीस

sakal_logo
By
सिद्धनाथ माने

मदनसुरी (जि.लातूर) : राज्याचे मुख्यमंत्री चार भिंतीच्या बाहेर पडत नसून त्यांना शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देखील वेळ नाही. त्यामुळे आम्ही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या (Rain In Latur) सोयाबीन या पिकाचे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी दिले आहेत. ते बॉक्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भेट देणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज सोमवारी (ता.चार) मदनसुरी (ता.निलंगा) (Nilanga) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना सांगितले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, खासदार सुधाकर शृंगारे, माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार,आमदार रमेश कराड, माजी मंत्री विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, पाशा पटेल, डॉ.सुनील गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, सचिव अरविंद पाटील, संतोष मुक्ता, ज्ञानेश्वर वाकडे, अजित माने, दत्ता चेवले यांच्यासह शेतकरी (Devendra Fadanvis Visit Rain Affected Latur District) उपस्थित होते.

हेही वाचा: Drugs case: आर्यन खानच्या सेल्फीमधील 'तो' मिस्ट्री मॅन कोण?

फडणवीस म्हणाले की, या वर्षी तरी शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन, तूर हे खरीप पीक लागेल असे वाटत होते. पण दुर्दैवाने तेही हातचे गेले. खूप वाईट परिस्थिती आहे. सरकारचे प्रतिनिधी पाहत नाहीत. विमा कंपनी लक्ष देत नाही. दहावी पास असलेले विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना पैसे द्या टक्केवारी वाढवतो म्हणत आहेत. विमा कंपनीवर सरकाचे अंकुश नाही. आमच्या काळात सरसकट विमा देण्यास आम्ही भाग पाडलं. ज्यांनी विमा भरला नाही, त्यांना देखील ५०% विमा दिला गेला. विज कनेक्शन तोडले जात आहेत. आमची सत्ता होती. त्यावेळी पाच वर्षात एकाही शेतकऱ्यांचे वीज तोडली गेली नाही. या सरकारचे कसल्याही प्रकारचे लक्ष राहील नाही. दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे नाहीतर सरकारला झोपू देणार नाही, असा शब्द फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांवर अस्मानीबरोबर सुलतानी संकट आल्याची टीका ठाकरे सरकारवर केली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना मदत करत असताना अल्पभूधारक व बहूभूधारक अशी अट न ठेवता सरसकट मदत जाहीर करावी ही मागणी देखील आम्ही सरकारकडे करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: संताप अन् संतापच ! चिखलातून काढावी लागली मुलीची अंत्ययात्रा

loading image
go to top