Forest department banned from going to three other places including Sinhagad 
पुणे

CoronaVirus : सिंहगडसह 'या' तीन ठिकाणी जाण्यास बंदी

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : कोरोना विषाणू संसर्गजन्य आजार झपाटयाने पसरत शक्यता असल्याने सिंहगड, पाचगाव- पर्वती, हिंगणे, भांबुर्डा वन उद्यानामध्ये मोठया प्रमाणावर पर्यटक, शिवप्रेमी, गडप्रेमी, व्यायामासाठी येत असतात. त्या सर्वांना पुढील आदेश येईपर्यंत सर्वांना बंदी घातली आहे. असे पत्र सहायक उपवनसंरक्षक संजय कडू यांनी आज एक प्रसिध्द करून जाहीर केले आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही वन विभागाने बंदी घातली आहे. सिंहगडावर पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झाल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत घट झालेली आहे. परंतु संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियंत्रण करणेसाठी शासनाच्या अधिसूचनेनुसार पूर्ण बंदी असल्यावर संसर्ग वाढणार नाही. म्हणून मंगळवार (ता. 17) आजपासून वन विभागाच्या हद्दीतील सर्व वन उद्यानात व सिंहगडावर सर्व प्रकारच्या पर्यटकांना दि.३१ मार्च २०२०पर्यंत प्रवेश दिला जाणार नाही. सिंहगडावर जाणाऱ्या डोणजे गोळेवाडी व कोंढणपूर मोरदरी मार्गे येणाऱ्या वाहने गडावर सोडली जाणार नाहीत. 

Coronavirus: पुण्यात आजपासून तीन दिवस व्यापार बंद 

सिंहगडावर रविवारी, शनिवार, गुरुवारी आतकरवाडीतून व्यायामासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच पायी जाणाऱ्या पर्यटकांना देखील याबाबत आवाहन केले आहे. या दरम्यान, गडावरील सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी हॉटेल दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. असे ही भांबुर्डाचे वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Raid On Ambani Companies : अंबानींच्या कंपन्यांवर १० ते १२ ठिकाणी छापेमारी, १५ पथके तपासात

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेसाठी नोंदणी आजपासून सुरू

IAF Sukhoi Crash : आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर शहीद

Iran–Israel Conflict: बॉम्ब-मिसाईलच्या सावटाखाली दुबईत अडकले; घरी पोहोचताच ‘जीव भांड्यात पडला’ सातारा, सांगली, रत्नागिरीतील २६ जणांची सुटका

SCROLL FOR NEXT