Harsul-Jail sakal
पुणे

बऱ्हाटेचा मुक्काम औरंगाबाद कारागृहातच

आरोग्याच्या कारणास्तव येरवडा कारागृहात हलविण्याचा अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मोकाअंतर्गत अटकेत असलेल्या रवींद्र बऱ्हाटे याला औरंगाबाद कारागृहातून येरवडा कारागृहामध्ये हलविण्याबाबतचा अर्ज विशेष मोका न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळला आहे. त्यामुळे बऱ्हाटे याचा मुक्काम हा औरंगाबाद कारागृहात राहणार आहे.

खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांत बऱ्हाटेला अटक करण्यात आली आहे. बऱ्हाटे हा त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या माध्यमातून तपासात अडथळे निर्माण करू शकतो. त्यामुळे त्याला औरंगाबाद कारागृहातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. मात्र त्याने तेथून येरवडा कारागृहात हलविण्याचा अर्ज न्यायालयात केला होता.

ससून रुग्णालयामध्ये हृदयविकार संदर्भात उपचार करायचा आहे. त्यामुळे मला येरवडा कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी बऱ्हाटे याने अर्जाद्वारे केली होती. या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला. बऱ्हाटे याची जानेवारी महिन्यात अ‍ॅन्जिओप्लास्टी झालेली आहे.

त्यामुळे ऑपरेशन करण्यासारखे उपचार तुर्तास बाकी नाहीत. औरंगाबादला हलविण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, डॉक्टरांनी प्रवास करण्यासाठी त्याला कोणती अडचणी नसल्याचे सांगितले आहे. औरंगाबाद येथील घाटी शासकीय रुग्णालयात अद्ययावत सुविधा आहेत. त्यामुळे गरज पडल्यास तेथे त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात.

आवश्‍यक असेल तर त्याला मुंबर्इ येथील शासकीय रग्णालयात देखील पाठवता येर्इल. त्यामुळे त्याला येरवडा कारागृहात आणण्याची करण्याची गरज नाही. तसेच त्याला येरवडा कारागृहात ठेवल्यास तो काही षडयंत्र करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. चव्हाण यांनी केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने बऱ्हाटे याचा अर्ज फेटाळण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 50,000 चे झाले तब्बल 7 लाख! 1320% रिटर्न देणाऱ्या शेअरची जोरदार चर्चा; 3 आठवड्यांत पैसा डबल

Vaibhav Sooryavanshi चा खेळ पाहण्यासाठी अजित आगरकर चेन्नईत पोहोचणार! KL Rahul ची माघार, हा सामना कुठे रंगणार, Live कुठे?

हिमालाय वितळण्याचं कारण मानवी मूत्र, दरवर्षी २५०० टन बर्फाचं होतंय पाणी; धक्कादायक माहिती समोर

Marathi News Live Updates: जेडब्ल्यू मॅरियट आणि शेराटन हॉटेलविरुद्ध पुणे पोलिसांची कारवाई

Teachers Day 2026: आयुष्यभराची २५ लाखांची कमाई मुलांच्या शिक्षणासाठी खर्चली; शिक्षकाने उभारली वंचितांसाठी शाळा!

SCROLL FOR NEXT