0gopichand_20padalkar_3.jpg 
पुणे

MPSC परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये भत्ता द्या, पडळकरांची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे- कोणत्याही परिस्थितीत येत्या 21 मार्चला एमपीएससीची परीक्षा घ्यायलाच हवी नाहीतर मी उपोषणाला बसेन असा इशारा भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. दि. 14 तारखेच्या परीक्षेसाठी ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी शहरात आले आहेत. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. आता परीक्षा 21 तारखेला असल्याने सर्वांना 7 दिवस थांबावे लागणार आहे. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना सरकारने 20 दिवसांचा भत्ता द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुणे येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. 

दि. 21 मार्चची परीक्षा जर वेळेत झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आपण आंदोलन करु असा इशारा त्यांनी यावेळी दिला. परीक्षांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. एमपीएसीच्या परीक्षेवरुन पडळकर यांनी महाविकास आघाडीवर आरोपांच्या फैऱ्या झाडल्या. 

महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने सत्तेवर आलेले आहे. विश्वासघात हा या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे. मराठा आरक्षण, धनगर समाजाचा निधी, वीज बिलाबाबत सरकार विश्वासघात करत आहे. पाचवेळा परीक्षा पुढे ढकलून हे सरकार आता विद्यार्थ्यांशी विश्वासघात करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. 

दरम्यान, एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पडळकर आणि सहकाऱ्यांना रात्री अटक करून जामिनावर सोडून देण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नोएल टाटा यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला दिली भेट

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT