esakal | विश्वासघात हा महाविकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम', पडळकरांचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

gopichand padalkar.png

मी पाकिस्तानहून आलोय का ? माझ्याबरोबरचे विद्यार्थी लादेन समर्थक होते का ? आमची केवळ परिक्षेची मागणी होती. परंतु, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.

विश्वासघात हा महाविकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम', पडळकरांचा हल्लाबोल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे- एमपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले भाजप आमदार गोपीनाथ पडळकर यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने सत्तेवर आलेले आहे. विश्वासघात हा या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे. मराठा आरक्षण, धनगर समाजाचा निधी, वीज बिलाबाबत सरकार विश्वासघात करत आहे. पाचवेळा परीक्षा पुढे ढकलून हे सरकार आता विद्यार्थ्यांशी विश्वासघात करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भावनेशी हे सरकार खेळत आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी मी रस्त्यावर उतरलो होते. मी पाकिस्तानहून आलोय का ? माझ्याबरोबरचे विद्यार्थी लादेन समर्थक होते का ? आमची केवळ परिक्षेची मागणी होती. परंतु, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.

काँग्रेसचे मंत्री म्हणतात मला विश्वासात घेतले नाही. महाराष्ट्र सरकारची जत्रा कारवाई सतरा असा टोलाही त्यांनी लगावला. आरोग्य भरतीमध्ये या सरकारने घोटाळा केला आहे. परिक्षांबाबत हे सरकार गंभीर नाही. हे सरकार गाफील होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

हेही वाचा- एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पडळकर आणि सहकाऱ्यांना रात्री अटक करून जामिनावर सोडून देण्यात आलं आहे. गुरुवारी पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेला रस्ता आता पूर्ववत सुरु झालेला आहे. मात्र, पोलिसांच्या दोन गाड्या बंदोबस्तासाठी या ठिकाणी अद्यापही आहेत. काल रात्री उशिरा पोलिसांनी दडपशाही करत आंदोलन मोडीत काढले होते त्यानंतर विद्यार्थी आपापल्या रूमवर निघून गेले. पोलीस दंगल नियंत्रण पथकाच्या 4 गाड्या आंदोलन स्थळी दाखल आहेत.

loading image
go to top