Crime_Burglary 
पुणे

सुरक्षा रक्षक असतानाही चोरट्यांनी मारला डल्ला; पुण्यात घरफोडीच्या ६ घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : धनकवडीतील चैतन्यनगरमध्ये एकाच रात्रीत चोरट्यांनी सहा सदनिकांत चोरी केली आहे. त्यातील एका सदनिकेतून चोरट्यांनी २९ हजारांचा ऐवज लांबवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यातील काही सोसायटीमध्ये रखवालदार आहे.

मंगळवारी (ता.९) सकाळी हे सर्व प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चोरीचे हे सर्व प्रकार शेजारी-शेजारी असलेल्या इमारतींमधील फ्लॅटमध्ये घडले आहेत. पाच सदनिकांचे मालक पुण्यात नसल्याने तेथून किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फिर्यादी तानाजी माधव जगदाळे (वय ६१) हे चैतन्यनगरमधील गुरुदत्त हौसिंग सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्या सदनिकेचे सेफ्टी डोअर आणि आतील दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून चोरटे घरात घुसले. त्यानंतर लाकडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील कपडे आणि चांदीची भांडी असा २९ हजाराचा ऐवज चोरुन नेला. यानंतर त्यांच्या बाजूच्याच अपार्टमेंटमधील श्रीकांत वैद्य यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला.

त्याच्या पुढेच असलेल्या अनंतनगर सहकारी गृहरचना सोसायटीमधील अभिजित मुडवीकर, रमेश कुंटे, दीपक गोहाड आणि योगेश बदी यांच्या सदनिकांचे सेफ्टी तसेच मेन डोअर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतरांच्या सदनिकेतून ऐवज चोरण्यात आला का नाही हे प्रत्यक्षात सदनिका मालक आल्यावर कळेल असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत. सुरक्षारक्षकांची नजर चुकवून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक चोरांच्या मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT