esakal | मुलींना जिन्स, स्कर्ट घालण्यास मनाई; नियम मोडणाऱ्यास होणार शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Jeans

आपल्याला संस्कृती नष्ट करण्यासाठी बंदुकीची गरज नाही. परंपरा सोडून दिली की आपोआपच आपली परंपरा नामशेष होते.

मुलींना जिन्स, स्कर्ट घालण्यास मनाई; नियम मोडणाऱ्यास होणार शिक्षा

sakal_logo
By
पीटीआय

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका खाप पंचायतीने मुलींना जिन्स आणि स्कर्ट घालण्यास मनाई केली आहे. तसेच मुलांना हाफ पँट घालण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यास शिक्षा दिली जाईल, असे खाप पंचायतीने म्हटले आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या पेहराव्यामुळे आपली संस्कृती आणि परंपरा नष्ट होत असल्याचे पंचायतीने म्हटले आहे.

छत्रवाल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पीपलशाह गावात २ मार्च रोजी पंचायत बोलावण्यात आली होती. राजपूत समुदायाच्या पंचायतीने म्हटले की, एखाद्या मुलाने किंवा मुलीने आदेशाचा भंग केल्यास त्याला शिक्षेबरोबरच बहिष्कारालाही सामोरे जावे लागेल. या पंचायतीत दहा-बाराहून अधिक गावातील पंचायतीतील सदस्यांनी सहभाग घेतला. समुदायाचे नेते, किसान संघाचे प्रमुख ठाकूर पुरन सिंह यांनी पंचायतीने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

भारतात प्लॅस्टिकबंदी करणारे प्रथम राज्य 'सिक्किम' ! एक भन्नाट यशस्वी पॉलिसी​

महिलांना/मुलींना जिन्स घालण्यास तर मुलांना हाफ पँट घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे कपडे परदेशातील संस्कृतीचे प्रतिक आहेत. जेव्हा परंपरा, संस्कृती लोप पावते, तेव्हा समाज देखील संपतो. आपण पारंपरिक कपड्यांचा पेहराव करायला हवा. जसे की साडी, घागरा, सलवार कमीज. आपल्याला संस्कृती नष्ट करण्यासाठी बंदुकीची गरज नाही. परंपरा सोडून दिली की आपोआपच आपली परंपरा नामशेष होते. आजपासून कोणताही पुरुष किंवा तरुण हा हाफ पँटवर दिसणार नाही. जर एखादा या निर्णयाला विरोध करत असेल, तर त्याला शिक्षेला सामोरे जावे लागेल.

ओडिशातील जंगलात महिन्याभरापासून आग; भारतातील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात​

पंचायत निवडणुकीत मद्यपान नको
आजकाल मुलींचा ओढा उच्च शिक्षणाकडे वाढत चालला आहे. मात्र त्यांनी परंपरेनुसार कपडे घालण्याबाबत आग्रही राहिले पाहिजे. आगामी पंचायत निवडणुकीत मद्यपानापासून देखील दूर राहिले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. पंचायत निवडणुकीतील जागेच्या आरक्षणांस खाप पंचायतीने विरोध केला.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top