sakal
पुणे

डिकसळ : ब्रिटीशकालीन पुलाजवळ कार उजनीच्या पाण्यात

मच्छीमारांच्या प्रसंगावधाने वाचले चालकाचे प्राण

डॉ. प्रशांत चवरे

भिगवण : डिकसळ(ता.इंदापुर) येथील पुलावरुन सोमवारी(ता.२७) सकाळी दहाच्या सुमारास पुण्याच्या दिशेने निघालेल्या कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे कार थेट उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवटयांमध्ये गेली. परंतु तेथे असलेल्या मच्छीमार पितापुत्रांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उडी घेतली. कारमधील चालकाचा प्राण वाचविण्यात मच्छीमारांना यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, करमाळा येथील मोटार कार करमाळ्याहुन पुण्याकडे निघाले होती. डिकसळ (ता.इंदापुर) येथील ब्रिटीशकालीन पुलाच्या जवळ कारवरील चालकांचा ताबा सुटुन कार थेट उजनी धऱणाच्या पाण्यात केली. कार चालकांसह उजनीच्या पाण्यात बुडू लागली.

सुदैवाने त्याच दरम्यान मच्छीमार बापु नगरे व समाधान नगरे हे पिता पुत्र त्या ठिकाणाहुन भिगवणकडे निघाले होते. त्यांनी कार पाण्यामध्ये बुडत असल्याचे पाहिले व प्रसंगावधान राखत थेट पाण्यामध्ये उडी घेऊन कारमधील चालकांचे प्राण वाचविले. कार ही करमाळा येथील असल्याचे समजले परंतु कार चालकाचे नाव समजु शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT