पुणे : ग्राहकांकडून महावितरणची मोठी आर्थिक फसवणूक

घरगुती वापराच्या वीज मीटर मधून व्यावसायिक कारणासाठी वीज वापर केल्या प्रकरणी नारायणगाव भागातील आठ ग्राहकांवर कारवाई करून १ लाख ६३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
महावितरण लोगो
महावितरण लोगोsakal

नारायणगाव : घरगुती वापरासाठीच्या वीज मीटर मधून व्यावसायिक ( वाणिज्य) कारणासाठी अथवा गाळ्यासाठी वीज वापर करणे विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार बेकायदेशीर आहे. घरगुती वापराच्या वीज मीटर मधून व्यावसायिक कारणासाठी वीज वापर केल्या प्रकरणी नारायणगाव भागातील आठ ग्राहकांवर कारवाई करून १ लाख ६३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. आशी माहिती महावितरणचे उपकार्यकरी अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांनी दिली.

महावितरण लोगो
पुणे: लोणीधामणीच्या पाणीप्रश्नावर महत्वाचे पाऊल

घरगुती व वाणिज्य वापरासाठीच्या वीज दरात मोठा फरक आहे. घरगुती ग्राहकांना ० ते१०० युनिट पर्यंत प्रति युनिट ३ रुपये ४४ पैसे तर वाणिज्य ( व्यावसायिक) वापरासाठी प्रति युनिट ७ रुपये १८ पैसे वीज दर आहे. ग्रामिण, निमशहरी भागात इमारत बांधकाम करताना निवासी म्हणून बांधकाम परवानगी घेतली जाते.त्या नंतर आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी घराच्या काही भागात अनधिकृत व्यावसायिक गाळे काढून हे गाळे भाडे तत्वावर दिले जातात. या गाळ्यांना घरगुती वापराच्या वीज मीटर मधून वीज पुरवठा करून गाळे धारक महावितरणची मोठी आर्थिक फसवणूक करत आहेत.

अनधिकृत बांधकाम केलेल्या या गाळ्यांची ग्रामपंचायत दप्तरी सुद्धा नोंद नसल्याने ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे कर उत्पन्न बुडत आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षा पासून सुरू आहे. मात्र आर्थिक हितसंबंध जोपासून या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

सिद्धार्थ सोनवणे (उपकार्यकरी अभियंता, महावितरण नारायणगाव) : परवानगी घरगुती वापराची वापर मात्र व्यावसायिक कारणासाठी या मुळे महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वीज चोरी करणाऱ्या आशा ग्राहकांची शोध मोहीम सुरू केली आहे.या प्रकाराची माहीती स्थानिक ग्रामपंचायतिने देऊन महावितरणला सहकार्य करावे.

राजेंद्र मेहेर (सरपंच ग्रामपंचायत ,वारूळवाडी): निवासी परवानगी घेऊन अनाधिकृतरित्या शेकडो व्यावसायिक गाळे वारूळवाडी भागात उभारले आहेत. ग्रामपंचायतीने गाळ्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. साने वस्ती, कॉलेज रोड भागात अनाधिकृत गाळ्याची संख्या जास्त आहे. वीज कंपनी मधून निवृत्त झालेल्या एका अभियंत्याने याच प्रकारे व्यावसायिक गाळे बांधकाम केले असून महावितरणने या प्रकरणी चौकशी करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com