PUNE
PUNE Sakal
पुणे

मेट्रोत करा वाढदिवस साजरा

दिलीप कुऱ्हाडे

येरवडा : तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत वाढदिवस साजरा करायला धावत्या मेट्रो मध्ये परवानगी मिळाली तर काय भन्नाट कल्पना आहे ना. पण हे वास्तवात लवकरच येणार आहे.लहान मुलांच्या वाढदिवस असो कि विवाहाचा वाढदिवस, प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या विशेष दिवस साजरा करण्यासाठी मेट्रो स्वागत करणार आहे. हौसेला मोल नाही असे म्हणतात पण अगदी नगण्य शुल्कात पुणेकरांना विविध कार्यक्रम धावत्या मेट्रोमध्ये साजरा करता येणार आहेत. (Pune News)

डिसेंबर अखेर मेट्रो रेल्वे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते वल्लभनगर आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालय दरम्यान धावणार आहे. त्यामुळे मेट्रो मध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी महामेट्रो मेट्रो मध्ये लहान मोठे वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देणार आहे. यामध्ये लहान मुलांचे वाढदिवस असो कि ज्येष्ठांचे वाढदिवस मेट्रोमध्ये साजरे करता येणार आहे. यामध्ये विवाहाची बोलणी, साखरपुडा असो कि विवाहाचा वाढदिवस सुध्दा धावत्या मेट्रोमध्ये साजरा करता येणार आहे. हा खर्च अेखाद्या सभागृहाच्या भाड्यापेक्षाही कमी असणार आहे. कार्यक्रम करणाऱ्या गटाला किंवा समुहाला तिकिटांसह अवघे तीन ते पाच हजार रूपये शुल्क आकारले जाणार आहे. महामेट्रो अशा प्रकारचे अभिनव उपक्रम नागपूर मेट्रो मध्ये राबवित आहेत. त्यामुळे पुणे मेट्रो मध्ये सुध्दा असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकृतसुत्रांनी दिली.

मेट्रो स्थानकावर होणार विविध कार्यक्रम

नागपूर मेट्रो स्थानकावर १५ ऑगस्ट रोजी महिलांसाठी मेंहदी उत्सव रंगला होता.याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मेट्रो स्थानकावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा विचार महामेट्रोचा आहे. त्यामुळे असे विविध उपक्रम पुणे मेट्रोच्या तीस स्थानकात राबविण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT