शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई

हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी कर्नाल घटनेचा केला निषेध
Farmers protest_Haryana DM
Farmers protest_Haryana DMSakal Media

चंदीगड : हरयाणातील कर्नाल येथील बस्तारा टोल नाक्यावर शनिवारी आंदोलक शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. या लाठीचार्जद्वारे या शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश देणाऱ्या हरयाणाच्या उपविभागीय दंडाधिकारी अर्थात एसडीएम आयुष सिन्हा यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

Farmers protest_Haryana DM
"PMRDAच्या पायाभूत सुविधांचं महापालिकेकडं होणार हस्तांतरण"

या लाठीचार्जपूर्वी एसडीएम पोलिसांना सूचना देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये त्यांनी स्पष्टपणे आंदोलकांनी विशिष्ट हद्दीत प्रवेश केल्यास त्यांची डोकी फोडण्याचे आदेश दिले होते. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना चौटाला म्हणाले की, एखाद्या आयएएस अधिकाऱ्यानं शेतकऱ्यांबाबत अशा प्रकारचे शब्द वापरणे हे निषेधार्थ आहे. त्यामुळे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल.

Farmers protest_Haryana DM
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, चौकशी सुरुच- CBI

दरम्यान, या लाठीचार्जमध्ये सुमारे १० लोक जखमी झाले होते. कर्नाल येथे भाजपच्या बैठकीसाठी निघालेल्या भाजप नेत्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्यासाठी शेतकरी टोल नाक्यावर आंदोलन करत होते. यावेळी हा प्रकार घडला. या घटनेवर आपली बाजू मांडताना पोलिसांनी सांगितलं की, या घटनेत केवळ चार शेतकरी जखमी झाले असून उलट दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Farmers protest_Haryana DM
बाळासाहेबांना दिलेल्या वचनाची आठवण; नारायण राणे म्हणाले...

या घटनेचा सुरुवातीला काँग्रेसनं निषेध नोंदवत याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर भाजप नेते वरुण गांधी यांनी देखील हा शेतकऱ्यांना मारहाणीचा व्हिडिओ शेअर करत हे निषेधार्ह असल्याचं म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com