Concern about how to pay rent to a leasing professional  
पुणे

Corona Virus : लॉकडॉऊनमध्ये दुकानमालकाकडून अशीही माणुसकी...

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे संपूर्ण देश 'लॉक डाऊन' आहे. त्याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. परंतु अशा कठीण प्रसंगातही माणुसकी जिवंत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशाच एका दुकानमालकाने भाडेकरूकडून या महिन्याचे भाडे न घेता ते नंतर परिस्थिती सुधारल्यानंतर देण्यास सांगितले.

Coronavirus : कोरोना व्हायरसचा फोटो समोर; कसा आहे कोरोना पाहाच!

ही घटना आहे चिंचवड गावातील भोईर कॉलनीमधील. रूपाली संगमेश्वर खुरपे यांनी पतीच्या मदतीने गेल्या महिन्यातच गंगा आर्केडमध्ये भाडेतत्त्वावर दुकान घेऊन नवीन व्यवसाय सुरू केला. सात फेब्रुवारीला दुकानाचे उद्घाटन झाले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्व व्यवहार बंद आहेत. दुकान जवळपास तीस दिवसासाठी बंद ठेवावे लागत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वांनी व्यवहार बंद ठेवणे काळाची गरज आहे. काही व्यावसायिक दुकान भाडेतत्त्वावर घेऊन त्यांचा व्यवसाय करीत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ बसत आहे. प्रत्येकालाच नुकसान सोसावे लागत आहे.  दुकान बंद असताना या महिन्याचे भाडे भरायचे कसे, असा प्रश्न रूपाली खुरपे यांच्यासमोर पडला होता. त्यांनी या दुकानाच्या मालक पुष्पा जांगडा यांना या महिन्याचे भाडे पुढील राहिलेल्या अकरा महिन्यांमध्ये विभागून द्यावे, अशी विनंती केली.

घरमालकांनी त्याला होकार देत या महिन्याचे भाडे पुढे परिस्थिती सुधारल्यानंतर काही महिन्यात विभागून द्या, असे सांगितले. त्यामुळे दुकानाचे भाडे कसे भरायचे, हा रूपाली यांना पडलेला प्रश्न काही दिवसांसाठी का होईना सुटला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT