Congress Protest For OBC Reservation  Sakal
पुणे

पुण्यात जिल्हाधिकार्यालयात काँग्रेस-ओबीसी आंदोलक एकमेकांत भिडले

आंदोलनादरम्यान ओबीसी कार्यकर्त्या मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

निनाद कुलकर्णी

पुणे : पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस आणि ओबीसी कार्यकर्ते (OBC Reservation ) एकमेकांत भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकार्यालयात मंगळवारी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेस आणि ओबीसी समाजातील कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. एवढेच नव्हे तर, आंदोलनादरम्यान, ओबीसी कार्यकर्त्या मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. (Congress Protest For OBC Reservation In Pune)

ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्यालयात (Collector Office Pune) आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलन सुरू असताना ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेस मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात केली घोषणाबाजी करत काळा झेंडा दाखवत निषेध व्यक्त केला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि ढोले पाटील यांच्यात धक्काबुकी झाली. ढोले पाटील या ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहेत. मात्र, ओबीसींच्या आरक्षणासाठी काँग्रेसनेच आयोजित केलेल्या आंदोलनात विजय वड्डेटीवार यांच्या नावाने घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Cleanliness: 'मुंबईला स्वच्छ शहराचा किताब का मिळू नये?' उच्च न्यायालयाचे महापालिकेला फटकारे, इंदूरचा आदर्श घेण्याचे निर्देश

Shirala Mini Konkan Monsoon Tourism : लोणावळा-महाबळेश्वर विसरा! शिराळ्याचं 'मिनी कोकण' धुक्यात न्हालं; विकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी, कास पठारसारखं खुललं सौंदर्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; सातारा, सोलापूरसह तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

Climate Change & Sleep: हवामान बदलाचा झोपवर परिणाम! भारत ठरतोय हॉटस्पॉट; शारीरिक, मानसिक आरोग्याला मोठा धोका

Income Tax 2026: TDS, TCS आणि Advance Tax म्हणजे नेमकं काय? फरक समजून घ्या नाहीतर भरावा लागू शकतो मोठा दंड

SCROLL FOR NEXT