murder
murder sakal
पुणे

Dhayari Crime : बांधकाम मजुराच्या डोक्यात वीट मारुन खून

विठ्ठल तांबे

धायरी - रविवारी झालेल्या भांडणातून बांधकाम मजुराच्या डोक्यात सिफोरेक्स ब्रिक्स ही वीट मारुन त्यास जखमी करुन त्याचा खून करण्यात आला. खुनी सुध्दा बांधकाम मजूर असून पळून गेला. आज दुपारी ३ पूर्वी सिंहगड रोडवर नांदेड सिटीच्या अलीकडे सर्व्हे नं. ३७ येथील बांधकामाच्या ठिकाणी ही दुर्घटना झाली.

पिंटु गौतम दास (वय-२८ वर्ष, सध्या रा. बांधकामाच्या ठिकाणी, मूळगाव-हिल्ली पुर्बा अप्तर, थाना/तहसिल हिल्ली, जि. दक्षिण दिनाजपुर, पश्चिम बंगाल ) असे खून झालेल्याचे नाव असून एजाज उल महंमद हसिब आलम (मूळगाव बिहार राज्य) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चंद्रकात देडगे यांच्या बिल्डींग बांधकामावरील ५ व्या मजल्यावर एजाज याने पिंटू याच्या डोक्यात वीटांनी घाव घातले.‌ १० तारखेला दोघांची काही कारणाने भांडणे झाली होती.

पिंटू याचा भाऊ छोटु गौतम दास (वय-२३ वर्षे, धंदा-मजुरी, रा. सध्या वानवडी) याने याबाबत फिर्याद केली असून सिंहगड रोड पोलीस तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT