Corona_Disaster 
पुणे

'कोरोनामुळे लाखो खर्च झाले, आता खिशात दमडीही नाही'; कोरोनाबाधित कुटुंबाची दर्दभरी कहानी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले...आता तब्येत बरी आहे...परंतु पुन्हा आपला अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे चाचणी करून घेण्यासाठी आता पैसेच शिल्लक नाहीत...तर चाचणी कशी करून घेणार, असा प्रश्न कोरोना बाधित रुग्णांनी उपस्थित केला आहे.

पुणे जिल्ह्यातील पिसोळी भागातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. तो रुग्णालयात दाखल झाला. त्यापाठोपाठ घरातील आई, वडील आणि लहान मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले. खासगी रुग्णालयात चाचणी आणि उपचारावर बराच खर्च झाला. घरी परतल्यानंतर पुन्हा आणखी 14 दिवस घरात विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले. घराबाहेर जाता येत नाही. रोजगार बुडाला. आजूबाजूचे लोक वेगळ्या नजरेने पाहतात. त्यामुळे मानसिक त्रास होतो. घर खर्च भागविण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत पुन्हा आपला अहवाल पॉझिटिव्ह आहे का नाही निगेटिव्ह हे तपासण्यासाठीही आता पैसे शिल्लक नाहीत, अशी खंत एका कोरोना बाधित कुटुंबाने व्यक्त केली. 

कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर चाचणीसाठी तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यानंतर पुन्हा खासगी रुग्णालयात भरमसाठ बिल आकारण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना बाधित कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून पुन्हा चाचणी केली जात नाही. किंवा रुग्णालयातून घरी सोडताना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला जात नाही. त्यामुळे तो रुग्ण कोरोनापासून मुक्त झाला आहे की नाही हे स्पष्ट होत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयातून उपचारानंतर घरी परतल्यास 14 दिवस घरात विलगीकरण कक्षात राहणे गरजेचे आहे. तसेच, तब्येतीत सुधारणा झाल्यास पुन्हा चाचणी केली जात नाही.
- भगवानराव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

14 दिवस विलगीकरण अनिवार्य : 
रुग्णालयातून घरी परतल्यानंतर संबंधित रुग्णांनी किमान 14 दिवस घरात स्वतःला करून विलगीकरण करून ठेवणे अनिवार्य आहे. या कालावधीत रुग्णांनी घराबाहेर जाऊ नये. त्यामुळे इतरांनाही कोरोनाची बाधा होण्याची भीती असते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

Kolhapur Crime News : वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Pune News: इंदापुरात २९ गायी-वासरांची सुटका; तीन वासरांचा गुदमरून मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक चित्र समोर!

SCROLL FOR NEXT