पदभरतीसाठी दीड लाख ट्विटचा पाऊस; राज्यभरातील तरुणांनी राज्य सरकारला विचारला जाब!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

पोलीस भरती, शिक्षक भरती, सरळ सेवा भरती, आरोग्य भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन पदभरती ठप्प केली आहे. राज्य सरकारला जाग येण्यासाठी म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

पुणे : राज्य सरकारने प्रलंबित ठेवलेल्या भरती प्रक्रिये विरोधात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी तरुणांनी दीड लाख ट्विट केली. राज्यात पुन्हा पद भरती सुरू करून रोजगार द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली, अशी माहिती मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली. 

या ऑनलाईन आंदोलनास राज्यभरातून तरुणांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. २ जुलै रोजी जवळपास ४२ हजार ट्विट करण्यात आले आहेत. दिनांक २७ जून ते २ जुलैपर्यंत सुमारे दीड लाखाहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. 

- मोठी बातमी : कृषी पदविका आणि तंत्र निकेतनची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द; कृषिमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब!

पोलीस भरती, शिक्षक भरती, सरळ सेवा भरती, आरोग्य भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन पदभरती ठप्प केली आहे. राज्य सरकारला जाग यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रलंबित शिक्षक भरतीची पुढील निवड यादी जाही करा, रखडलेली पोलीस भरती तात्काळ सुरू करा, आरोग्य विभाग भरती त्वरित करा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करा, ही मागणी करत. या सर्व प्रलंबित प्रश्नांच्या बाबत सरकारला प्रश्न विचारणाऱ्या इमेज देखील आंदोलना दरम्यान तरुणांनी आपल्या समाज माध्यमांवर पोस्ट केल्या आहेत. 

- Breaking : भाजपची नवी 'जम्बो' कार्यकारिणी जाहीर; नव्या टीममध्ये कुणाला मिळालं स्थान?

यादव म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य सरकारमधील काही वरिष्ठ मंत्र्यांची देखील या बाबत भेट घेण्यात येणार आहे. तसेच लवकरच शिक्षक भरती प्रक्रियेतील काही प्रतिनिधींना सोबत घेऊन शिक्षण संचालक विशाल सोलंकी यांच्यासोबत झूम बैठक घेण्यात येणार आहे. 

२६ जूनपासून या आंदोलनाबाबतची भूमिका तसेच आंदोलनाचा इशारा सातत्याने समाजमध्यमांद्वारे देण्यात येत आहे. ही एक चळवळ असून हा लढा राज्य सरकारच्या दिरंगाई विरोधात असून जो पर्यंत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे यादव यांनी सांगितले. 

- शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची भरती; पुणे विद्यापीठ आणि जेएनयूतील 'इतके' प्राध्यापक इच्छुक!

राज्यातील शिक्षक भरतीची प्रलंबित यादी जाहीर करणे, २०१९ मधील रखडलेली पोलीस भरती प्रिक्रिया पूर्ण करणे, महा आयटीद्वारे सरळ सेवा भरतीसाठी नेमण्यात येणाऱ्या कंपनीचे टेंडर जाहीर व्हावे, राजेश टोपे यांनी जाहीर केलेली आरोग्य विभागाची भरती तातडीने सुरू करणे अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे देखील यादव यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Navnirman vidyarthi sena staged an online agitation on Twitter against pending recruitment