(सौजन्य - Money Control)  
पुणे

Cyrus Poonawalla: 'सिरम'चे चेअरमन सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा झटका! पुण्यात उपचार सुरु

डॉ. परवेझ ग्रँट यांनी ही माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : सिरम इन्सिट्युट ऑफ इंडिया या औषध उत्पादक कंपनीचे चेअरमन सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Cyrus Poonawalla SII Chairman suffered heart attack treatment undergo in Ruby Hall Clinic Pune)

पुनावालांची प्रकृती स्थिर

सायरस पुनावाला (वय ८२) यांच्यावर आम्ही अँजिओप्लास्टी केली आहे, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्ध कार्डियॉलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली. तसेच रुबी हॉलचे कॅथलॅब इन्चार्ज डॉ. सी. एन. मखाले यांनी सांगितलं की, पुनावाला यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. तसेच ते यातून लवकर रिकव्हर होत आहेत, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे सल्लागार अली दारुवाला यांनी दिली. (Latest Marathi News)

अँजिओप्लास्टी झाली

तसेच डॉ. परवेज ग्रँट यांच्या मार्गदर्शनाखाली सायरस पुनावाला यांच्यावर अँजिओप्लाटी करण्यात आल्याची माहिती डॉ. मखाले आणि डॉ. अभिजीत खडतरे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT