pune sakal
पुणे

दादा कोंडके यांनी ग्रामीण विनोदाची नाडी ओळखली

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; समाजभूषण पुरस्काराचे वितरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘विनोदाचे अनेक अंग असतात, त्यातील द्विअर्थी विनोद प्रकार निवडून दादा कोंडके यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भरभरून हसायला शिकवले. दादांना ग्रामीण जनतेची विनोदबुद्दीची नस गवसल्याने जनतेने दादांना डोक्यावर घेतले होते,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

दादा कोंडके फाउंडेशनतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या समाजभूषण पुरस्काराचे वितरण सबनीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यंदा २०२० आणि २०२१ साठी अनुक्रमे दादा कोंडके यांच्या जीवनावर आधारित ‘एकटा जीव’ या आत्मचरित्राच्या लेखिका अनिता पाध्ये आणि रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांना प्रदान करण्यात आला. या वेळी महावितरण पुणे कार्यालयाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर दादा कोंडके फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त आणि कार्यक्रमाचे निमंत्रक मनोहर कोलते, फाउंडेशनचे सचिव राजेंद्र भवाळकर, जिल्हा सरकारी वकील एन. डी. पाटील आदी उपस्थित होते.

या प्रसंगी महाराष्ट्र सरकारकडून प्रमुख जिल्हा सरकारी वकिलपदी नियुक्ती झालेले अॅड. एन. डी. पाटील, दुग्ध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले उद्योगपती नितीन थोपटे, आदिवासी लघुपटांचे निर्माते डॉ. कुंडलिक केदारी, समाज प्रबोधनाच्या कार्याच्या कीर्तनरूपी सेवेबद्दल पूनम जाचक आणि स्केटिंग या खेळात देश पातळीवर सुवर्णपदक मिळविल्याबद्दल वैदेही आणि श्रुतिका सरोदे यांचा सत्कार करण्यात आला.

सुवर्णा माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT