esakal | VIDEO : हेलिकॉप्टरला लटकणारा तालिबानी; अफगाण पत्रकाराने सांगितलं सत्य
sakal

बोलून बातमी शोधा

हेलिकॉप्टरला लटकणारा तालिबानी; अफगाण पत्रकाराने सांगितलं सत्य

व्हायरल व्हिडिओवरून असा दावा केला जात आहे की, तालिबानींनी व्यक्तीला शिक्षा देताना क्रूरतेचा कळस केला. त्याला फासावर लटकवून हेलिकॉप्टरला बांधून शहरावरून मृतदेह फिरवण्यात आला.

हेलिकॉप्टरला लटकणारा तालिबानी; अफगाण पत्रकाराने सांगितलं सत्य

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काबुल : अमेरिकेने 20 वर्षांनंतर त्यांचे सैन्य अफगाणिस्तानातून मागे घेतले. 30 ऑगस्टला अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून पूर्णपणे बाहेर पडले. यावेळी अमेरिकेचे अनेक शस्त्रे, वाहने आणि हेलिकॉप्टर काबुलमध्ये सोडून द्यावे लागले. आता अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात असून इथल्या अनेक क्रूर घटना समोर येत आहेत. दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओवरून असा दावा केला जात आहे की, तालिबानींनी व्यक्तीला शिक्षा देताना क्रूरतेचा कळस केला. त्याला फासावर लटकवून हेलिकॉप्टरला बांधून शहरावरून मृतदेह फिरवण्यात आला.

व्हिडिओ शेअर करताना असं सांगण्यात येत होतं की, ज्या हेलिकॉप्टरला व्यक्ती लटकली होती ते अमेरिकेचं हॉक हेलिकॉप्टर होतं. तालिबानकडून अशा क्रूर पद्धतीने शिक्षा दिली जात आहे असा दावा केला जात होता. मात्र आता या व्हिडिओचे सत्य समोर आले आहे.

अफगाणिस्तानमधील स्थानिक पत्रकाराने या व्हिडिओमागचे सत्य सांगितले आहे. जी व्यक्ती हेलिकॉप्टरला लटकली आहे ती 100 मीटर उंचीवर झेंडा फडकवण्याचं काम करत होती.

हेही वाचा: मोहिम फत्ते, अफगाणिस्तान सोडण्याशिवाय पर्याय नव्हता - बायडेन

व्हिडिओ शेअर करताना शिक्षेबाबत जो दावा केला जात होता तो खोटा आहे. अशा प्रकारे कोणतीही शिक्षा दिली जात नव्हती. हेलिकॉप्टरला लटकणारी व्यक्ती तालिबानीच होती. तो झेंडा लावण्यासाठी लटकला होता. झेंडा इतक्या उंचीवर फडकवायचा होता की त्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. व्हिडिओ काबुल एअरपोर्टवरील असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात हा व्हिडिओ कंधारच्या गव्हर्नर कार्यालयाजवळचा आहे.

एका अमेरिकन पत्रकाराने व्हिडिओ शेअर करून दिलेल्या चुकीच्या माहितीवर अफगाणिस्तानमधील पत्रकार बिलाल यांनी ट्विट केलं आहे. जी व्यक्ती हेलिकॉप्टर उडवत आहे त्यांना अमेरिका आणि युएईमधअये ट्रेनिंग मिळालं आहे. तसंच लटकणारी व्यक्ती तालिबानी आहे आणि झेंडा लावण्यासाठी त्याने प्रयत्न केले पण त्यात यश आलं नाही.

loading image
go to top