pm modi  sakal
पुणे

PM मोदींना बॉम्बनं उडवून देऊ, देशात बॉम्बस्फोट घडवून आणू; पुण्यात एका व्यक्तीला ई-मेलवर धमकी आल्याने खळबळ

पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक ईमेल द्वारे धमकी देण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार धमकीचे फोन येत आहेत. असाच पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक ई-मेल आला आहे.

एका व्यक्तीने सोशल मिडीयावर विदेशातून ई-मेल करत ही धमकी दिली होती. एम. ए. मोखीम असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 'मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे', असं त्या व्यक्तीने म्हटलं आहे. देशात अनेक ठिकाणी मृत्यू घडवून आणण्याची धमकीसुद्धा आरोपी मोखीम या नावानं जीमेल वापरणाऱ्या व्यक्तीनं ई-मेल केला आहे.

ज्या व्यक्तीला हा ई-मेल आला होता, त्यांनी पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला याबाबतची माहिती देऊन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे पुण्यात दहशतवादी संघटनेशी संबधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असताना आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशातूनच उडवून देण्याचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे. अलंकार पोलिस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT