Demand for electricity in Pune area has dropped ten percent 
पुणे

पुणे परिसरात १० टक्के विजेच्या मागणीत घट; पंतप्रधानांच्या आवाहनाचा परिणाम

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाऊनमुळे राज्यातील विजेची मागणी निम्म्याने घटली आहे. त्यातच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे त्यामध्ये आणखी दहा टक्‍क्‍यांनी घट झाली. परिणामी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास गेल्या अनेक वर्षातील सर्वांत कमी म्हणजे 10 ते 11 हजार मेगावॅट एवढा वीजपुरवठा झाला. तर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून सुमारे 600 ते 700 मेगावॅटपर्यंत विजेचा पुरवठा झाला. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 24 मार्चपासून लॉकडॉऊन लागू केला आहे. देशात सर्वाधिक विजेचा वापर असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखले जाते. राज्यात दरदिवशी साधारणपणे 22 ते 23 हजार मेगावॅट एवढी मागणी असते. परंतु लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसात ही मागणी निम्याने घटली आहे. ती 13 हजार मेगावॅटवर आली आहे तर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून दर दिवशी 1300 मेगावॅट एवढी मागणी असते. तिच्यामध्ये देखील चाळीस टक्‍क्‍यांनी घट होऊन, ती सुमारे 800 मेगावॅटवर आली आहे. 

पंतप्रधानांनी आज सायंकाळी नऊ वाजता नऊ मिनिटे दिवे बंद करून, टाळ्या वाजविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आधीच निम्म्यावर आलेल्या विजेच्या मागणीत आणखी दहा टक्‍के घट झाली. या कालावधीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून 700 मेगावॅटवर मागणी आली. 

राज्यात हीच मागणी 13 हजार मेगावॅटवरून 10 ते 11 हजार मेगावॅटपर्यंत खाली आली होती, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी 'सकाळ'ला सांगितले. 

औद्योगिक मागणीत घट 
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आहेत. त्यांच्याकडून विजेची मागणी असते. त्यामुळे दरदिवशी ही मागणी सुमारे 1300 मेगावॅटपर्यंत जाते. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक आणि व्यावसायिक मागणी पूर्ण बंद झाली आहे. त्यामुळे सध्या 700 ते 800 मेगावॅट विजेचा पुरवठा होतो, असे महावितरणकडून सांगण्यात आले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत नवं राजकीय समीकरण! छगन भुजबळ दिल्लीला जाणार; पुतण्याला मंत्रिपद मिळणार? मोठा राजकीय डाव

विमल खाऊन आला आणि बाथरूममध्ये ओकला, सुरज चव्हाणच्या नव्या घरात चाहत्याचा राडा; बायको संतापली

Latest Marathi News Update: जळगाव जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पाऊस

मोफत गणवेश योजना पुन्हा अडचणीत! २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट कसं शिवायचं? कमी निधीमुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली

Vladimir Putin: ''एकेकाळी अमेरिकेने मोदींवर निर्बंध आणले होते, मात्र आज...'', पुतिन यांनी करुन दिली भारताच्या ताकदीची जाणीव

SCROLL FOR NEXT