Vinayak-Mete 
पुणे

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी; कोणी केली मागणी?

सकाळवृत्तसेवा

पुणे - मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर 11 ऑक्‍टोबर, 1 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलावी व उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी "मराठा विद्यार्थी परिषदे'ने आज पत्रकार परिषदेत केली आहे. आमदार विनायक मेटे यावेळी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या संकटामुळे एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये होणा-या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सद्यपरिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खेड्यापाड्यापर्यंत हे लोण पसरलेले आहे. स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य व अनेक विद्यार्थीही कोरोना ग्रस्त असल्याने त्यांना अभ्यास करून देखील परीक्षा देणे शक्‍य होणार नाही. मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आम्हा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. त्यामुळे सरकारने या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी मेटे यांनी केली. परिषदेला अनुप देशमुख, परम बिराजदार, अर्चना पाटील, विक्रम गायकवाड आणि पूजा झोळे उपस्थित होते.

नेमकी काळजी कोणाची ?
एमपीएससी परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील अभ्यास करणा-यांचे प्रमाण मोठे आहे. हे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करू शकलेले नाहीत. यूपीएससी परीक्षेला सुमारे 35 टक्के विद्यार्थी हजरच झाले नाहीत. तशीच परिस्थिती आता होऊ शकते. मराठा समाजातील जे नेते ही परीक्षा होऊ द्यावी, असे म्हणतात त्यांना आमचे भविष्य खराब करायचे आहे का? आमच्या भविष्यापेक्षा त्यांना क्‍लासेसवाल्यांची? इतर समाजाची? की सरकारची काळजी आहे का? हे स्पष्ट करावे, असे मेटे म्हणाले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! ३९२ जणांचा मृत्यू, १५०० बेपत्ता; २९० भारतीयांशी संपर्क तुटला

आजचे राशिभविष्य - 28 ऑगस्ट 2026

Narali Bhat: नारळी भात तर प्रत्येकाच्या घरी बनतो! पण ‘या’ रेसिपीची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भुरळ पाडेल

Raksha Bandhan Wishes in Marathi: आईसारखी माया करणारी बहीण अन् देवासारखं रक्षण करणारा भाऊ! रक्षा बंधनानिमित्त भांवंडांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Nepal Flood: भिंत खचली, चूल विझली, होते नव्हतेे नेले! नेपाळच्या महापुरात ३५९ जणांचा मृत्यू; २८८ भारतीय पर्यटक बेपत्ता, बचावासाठी प्रयत्न..

SCROLL FOR NEXT