खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्यालयासमोर उतरले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक

रवींद्र पाटे
Tuesday, 6 October 2020

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील कार्यालया समोर आक्रोश आंदोलन केले.

नारायणगाव : मराठा समाजाला  हक्काचे आरक्षण मिळावे, मराठा आरक्षण आंदोलनात निरपराध तरुणांवर दाखल केले गुन्हे मागे घ्यावेत,मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी एसइबीसी प्रवर्गातुन विद्यार्थ्यांना मिळालेले प्रवेश संरक्षित करावेत या प्रमुख व इतर मागण्यांसाठी आज पिंपरी-चिंचवड येथील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील कार्यालया समोर आक्रोश आंदोलन केले.

या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे मारोती भापकर, जीवन बोराडे, प्रतीक इंगळे, सागर तापकीर, अविषेक म्हसे, महेश गीते, अक्षय जरे आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

 दरम्यान या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मागण्यांचे निवेदन खासदार डॉ. कोल्हे यांचे बंधू व जुन्नर बाजार समितीचे माजी संचालक दिलीप कोल्हे यांनी स्वीकारले.

या वेळी कोल्हे म्हणाले मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे प्रयत्नशील आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी डॉ. कोल्हे यांनी १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha agitation in front of MP Amol Kolhe's office