deer.jpg 
पुणे

Video : केरळच्या `त्या` हत्तीणीला पुण्याच्या `या` हरिणीचा वाटत असेल हेवा....

सागर आव्हाड

पुणे : एकीकडे केरळमध्ये गर्भवती हत्तींनीला स्फोटके भरलेले अननस देऊन मृत्यूच्या भोवऱ्यात टाकलेले प्रकरण आपण सर्वांनी वाचले व हळहळ व्यक्त केली. भुतदया व त्याविषयची संवेदना हल्ली नष्ट होत असताना पुण्याचे सुपूत्र उप महाराष्ट्र केसरी पहिलवान महेश मोहोळ यांनी एका जखमी गर्भवती हरणीचे प्राण वाचवून भुतदयेचे अनोखे उदाहरण आज दिले.

आज सकाळी नांदेड सिटी येथे भटकत आलेले एक हरीण प्लास्टिक कागदाचे वेटोळे पायात गुंतून जखमी अवस्थेत आले असताना मोकाट कुत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर हल्ला चढवला होता. मोहोळ हे सकाळी व्यायामाला जात असताना कुत्र्यांचा गोंगाट ऐकून जवळ गेले असता त्यांना हरीण जखमी अवस्थेत दिसली. त्यांनी तात्काळ कुत्र्यांना हालकून हरणीच्या जवळ जाऊन पाहणी केली आणि जवळच असणाऱ्या आपल्या घरी नेऊन तिच्यावर प्रथमोपचार केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

घाबरलेली हरीण या उपचाराने स्थिर झाली. त्यानंतर मोहोळ यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क केला व त्यानंतर वन विभागाचे पथक घरी आले. वन विभागाने हरणीला ताब्यात घेतले. हरणीला उपचार करुन पुन्हा जंगलात सोडले जाणार असल्याची खात्री करुन महेश मोहोळ यांनी ती हरीण वन खात्याकडे सुपूर्द केली.
मोहोळ यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT