पुण्याच्या इतिहासातील 'ती' काळी तारीख...ढगफुटी...आंबिल ओढा..अन्...

September 25 2019 became a black date in the history of Pune due to cloudburst
September 25 2019 became a black date in the history of Pune due to cloudburst

आंबिल ओढा. पेशवाईच्याही पूर्वीपासून अस्तित्त्व असलेला हा ओढा कधी तरी पुणेकरांच्या डोळ्यात पाणी आणेल, असे वाटले नव्हते. पण, एका रात्रीच्या तुफान पावसाने कहर आणला आणि पुण्याच्या दक्षिण भागात अक्षरशः पूरच आला. त्यात विविध भागांत 13 जणांना जीव गमवावा लागला अन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या जिवीत आणि वित्तहानीने पुणे पहिल्यांदाच सुन्न झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा तयार होतो आंबिलओढा 

कात्रजच्या डोक्यावर डोंगररांगा आहेत. गुजरवाडी, निंबाळकरवाडी, मांग़डेवाडी परिसरातून पावसाचे पाणी एका ओघळाने खाली कात्रजच्या दिशेने येते आणि तेथेच आंबिलआेढा तयार झाला आहे. कात्रज तलावाच्या शेजारून हा ओढा वाहत धनकवडी, पद्मावती, अरण्येश्वर, पर्वती दर्शनकडून दांडेकर पुलाच्या दिशेने जात नव्या पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीजवळ मुठा नदीत जातो. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या या ओढ्याला बारा महिनेही पाणी असते. 

- '...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?

- कशामुळे आला आंबिल ओढ्याला पूर 

गेल्यावर्षी पुण्यात पाऊस खूप झाला होता. शहरात 20-22 सप्टेंबरपासून पाऊस सुरू होता. 23 सप्टेंबरलाही पाऊस होताच. मात्र, 25 सप्टेंबरला संध्याकाळी साडेसात- आठ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. पहाटे दोन-अडीच वाजेपर्यंत सुरू होता. ढगफुटीसदृश्य पाऊस होता.

मुळशीतील 2200 घरांचे नुकसान, मंत्री शेख व आमदार थोपटे यांच्याकडून पाहणी



पावसाचे रौद्र रूप बघून नागरिकांना धडकीच भरली होती. दांडेकर पूल, मित्र मंडळ चौक, जेधे चौक, अरण्येश्वर, पर्वती दर्शन, मार्केटयार्ड, पद्मावतीचा स्वामी विवेकानंद चौक या भागात पाणी इतके साचले होते की, नागरिकांना गाड्या रस्त्यात उभ्या करून घरी चालत जावे लागत होते. एका रात्रीत तब्बल 87. 3 मिलीमीटर पाऊस पडला होता. गेल्या आठ वर्षांत एका दिवसातील पावसाचा तो उच्चांक होता. परिणामी आंबिल ओढा कोपला अन नागरिकांवर संकट कोसळले. 

कोरोनामुळे आता कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढणार; वाचा

- त्या रात्री नेमके काय झाले 

सततच्या पावसाने आंबिल ओढ्याला अगोदरच पूर आलेला होता. त्यात त्या रात्रीची भर पडली. कात्रज तलावही भरून वाहतच होता. डोंगर माथ्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. ते पाणीही आंबिल ओढ्यातच जमा होत गेले. त्यामुळे एरवी छोटा वाटणारा नाल्याचे रूपांतर त्या दिवशी रात्री चक्क नदीतच झाले होते. त्यामुळे प्रवाहाच्या बाहेर दुतर्फा पाणी पसरले. त्यामुळे कात्रज तलावाजवळील लेकटाऊन आणि परिसरातील अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले. तेथून बालाजीनगर आणि बिबवेवाडीच्या मध्यभागातील सोसायट्यांही सुटल्या नाहीत. गुरुराज सोसायटी, गिरीजाशंकर सोसायटी, के. के. मार्केट येथेही पाणी शिरले. त्यातच 25 सप्टेंबरला रात्री अकरा वाजल्यापासून 26 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत कात्रज तलाव फुटला, अशी अफवा पसरली होती. त्यामुळे परिसरातील रहिवाशी भयकंपित झाले होते. अगदी दुसऱया दिवशी सकाळपर्यंत अफवांमुळे भीतीचे वातावरण होते. महापालिका, पोलिसांनी जेव्हा कात्रज तलाव सुरक्षित आहे, असा खुलासा केला तेव्हा वातावरण निवळले.

- पुणे- नाशिक रेल्वेबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले पाहा!

- असा झाला परिणाम 

पद्मावती ओलांडल्यावर ओढ्याचे पाणी ट्रेझर पार्क आणि लगतच्या सोसायट्यांमध्ये शिरले. त्यात हजारो वाहने पाण्याखाली गेली. पुढे काही अंतरावर तर, टांगेवाला कॉलनीत कहरच झाला. पाऊस, पूर यामुळे घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. गंगातीर्थ, अरण्येश्वर, तावरे कॉलनी, शिवदर्शन, पर्वती दर्शन अण्णाभाऊ साठे वसाहत, एलआयसी कॉलनी, आंबेडकर, झोपडपट्टी आदी भागांतील घरातच ओढ्याचे पाणी शिरले. उतार असल्यामुळे पाण्याला ओढ जबरदस्त होती. त्यामुळे ओढ्यातून पाणी दुतर्फा जागा मिळेल तेथे घुसत होते. गुरुराज सोसायटीमध्ये तर पहिल्या मजल्याच्या जिन्यापर्यंत पाणी शिरले होते. शिवदर्शन, पर्वती दर्शन, तावरे कॉलनी, साठे वसाहत, आंबेडकर झोपडपट्टीमध्ये तर, घरांमध्ये सुमारे तीन फुटांपर्यंत पाणी साठले होते. दीड-दोन फुटांचा चिखल साठला होता. त्यामुळे हजारो कुटुंबियांचे संसार त्यांच्या डोळ्या देखत वाहून गेले. रस्त्यांवर पाण्याबरोबर आलेला गाळ, खडी आणि राडारोडा पसरला होता. अनेक ठिकाणी वाहत आलेली वाहने अस्ताव्यस्त पसरली होती. आंबिल ओढ्याच्या काठावर तर, काही सोसायट्यांमध्ये मोटारी तर एकमेकांवर अक्षरशः आदळल्या होत्या. दुचाकी वाहनेही वाहत असल्याचे चित्र होते. त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने दक्षिण पुण्याचा म्हणजे बिबवेवाडी, मार्केटयार्ड, पद्मावती, सहकारनगर, अरण्येश्वर, बालाजीनगर, कात्रज आदी परिसराचा वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे गोंधळात भर पडली होती. लोकांचे मोबाईल चार्ज नसल्यामुळे त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता तर, सोसायट्यांमध्ये विजेअभावी पाणी सदनिकांत पोचत नव्हते. मित्र मंडळ चौक, दांडेकर पूल परिसरातही ओढ्याच्या पाण्याने कहर केला होता. मित्र मंडळ सोसायटीतील अनेक बंगले पाण्याखाली गेले होते तर, पार्किंगही पाण्याने भरले होते. के. के. मार्केट, अण्णाभाऊ साठे प्रेक्षागृह, ट्रेझर पार्क सोसायटी यांच्या पार्किंगमध्येही पाच फुटांपर्यंत पाणी साठले होते. पाणी उपसण्यासाठी अग्निशामक दलालाही विशेष यंत्रणा उभारावी लागली होती.

 - लाल महालात कसा साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा; वाचा सविस्तर!
 

- या भागाला बसला फटका 

कात्रज, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, गुरुराज सोसायटी,मोरे वस्ती, ट्रेझर पार्क, टांगेवाला कॉलनी,अण्णा भाऊ साठे वसाहत संतनगर, तावरे कॉलनी, बागुल उद्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत लक्ष्मी नगर, मित्रमंडळ चौक, पर्वती पायथा, दांडेकर पूल आदी.

- स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; परिस्थिती जाणून घ्या एका क्लिकवर

 

- पूर ओसरल्यावरही दुखणे कायम 

26 सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे मदत कार्याला वेग आला. पूरग्रस्त वसाहतींचे पंचनामे झाले. वाहनांच्या विमा कंपन्या नागरिकांच्या घरांपर्यंत 
पोचल्या. महापालिकेने काही कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर केले. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. परंतु, पंचनामे, विम्याचे दावे यांची प्रक्रिया लांबतच गेली. अजूनही अनेक दावे सेटल झालेले नाहीत तर, पूरग्रस्तांना मदतीची अजूनही प्रतीक्षाच आहे. म्हणूनच 25 सप्टेंबर ही तारीख पुण्याच्या इतिहासात एक काळरात्र ठरली. 

- 'सारथी'तील विस्कळीत कारभाराबाबत मराठा संघटना काय म्हणाल्या पाहा!

शहराच्या अन्य भागालाही फटका 

सिंहगड रस्ता, बाणेर, बालेवाडी, औंध, विश्रांतवाडी, मांगडेवाडी, आंबेगाव आदी भागातही विविध सोसायट्या, घरांच्या आवारात पाणी शिरले होते. बाणेर - बालेवाडीमध्ये तर, काही सोसायट्यांमध्ये अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाला बोटींचा वापर करावा लागला. सिंहगड रस्त्यावर मधुकर हॉस्पिटल, औंधमधील ज्युपिटर हॉस्पिटलमधील रुग्णांनाही बाहेर काढण्याचे काम अग्निशामक दलाला करावे लागले. शहरात पावसाचे पाणी साठणारी 55 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. दरवर्षी तेथे विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु, पहिल्यांदाच शहरात विविध ठिकाणी पाणी साठल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका, अग्निशामक दल आणि पोलिसांची प्रचंड धावपळ झाली. ताडीवाला रस्ता, पाटील इस्टेट, जनता वसाहत येथील झोपडपट्ट्यांनाही पावसाचा प्रचंड फटका बसला. रात्रीचा 10-12 तासांचा पाऊस शहराची दुरवस्था करून गेल्याचे दिसून आले. 

दुबईची ट्रिप झालीच नाही 

महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे हे 25 सप्टेंबर रोजी सहकुटुंब दुबईच्या सहलीला निघाले होते. सायंकाळी पाच वाजता त्यांनी मुंबईला जाण्यासाठी पुणे सोडले. वाटेत असतानाच कात्रज, आंबेगाव, धनकवडी, बिबवेवाडी परिसरातून खूप फोन येत असल्याचा त्यांना निरोप मिळाला. नेहमीच्या पावसासारखे हे फोन नाहीत, असेही त्यांना कर्मचाऱयांकडून समजले. वाघमारे यांनी आढावा घेतला. परिस्थिती गंभीर आहे, असे लक्षात आल्यावर विमानतळावरूनच ते पुण्याकडे परतले. या बाबत म्हणाले, ''माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पुण्यात इतका मोठा पाऊस आणि त्यामुळे झालेले नुकसान बघितले. टांगेवाला कॉलनीतील दुर्घटनेतील सहाजण आणि वाहून आलेले 7 मृतदेह, असे एकूण 13 मृतदेह आम्हाला हाताळावे लागले. सोसायट्या, हॉ़स्पिटल, पाण्यात अडकलेले नागरिक, रस्त्यात बंद पडलेल्या गाड्या, पडलेली झाडे, रस्ते पाण्याने भरलेले'', अशी परिस्थिती पहायला मिळाली. 

11 तासांतील अग्निशामक दलाची कामगिरी 

- या काळात अग्निशामक दलाने 35 ठिकाणांवरून 575 नागरिकांची सुटका केली
- 12 ठिकाणी पडलेली झाडे दूर केली
- चिखल साठल्याचे 24 कॉल अॅटेंड केले
- 17 ठिकाणी मोटार लावून पाणी उपसावे लागले 
- 37 ठिकाणी शॉटसर्किट, आगीच्या घटना घडल्या
- 13 मृतदेह पोलिसांच्या मदतीने ससून रुग्णालयात हलविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com