dhananjay desai first reaction aftersession court of pune relive all accused in mohsin shaikh murder case  Sakal
पुणे

Mohsin Shaikh Murder Row : 'सरकारने सोयीचे आरोपी शोधले होते'; निर्दोष मुक्ततेनंतर देसाईंची पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील मोहसीन शेख हत्येप्रकरणातील संशयित हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईंसह सर्व २० आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, यानंतर धनंजय देसाई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

२०१४ मध्ये शिवाजी महाराज यांची विटंबना केली होती . खरे आरोपी शोधायचे सोडून त्या वेळी सरकार ने त्यांच्या सोयीचे आरोपी शोधले होते असा आरोप देसाई यांनी केलाा आहे.

पुढे बोलताना धनंजय देसाई म्हणाले की, महाराष्ट्रात आघाडी सरकारला सत्ता जाणार आहे हे माहीत होतं, म्हणून तेव्हाच्या सरकारने पोलिसांचा वापर करून खोटे आरोपी तयार केले. आज न्यायालयाच्या लक्षात आलं की ही खोटी केस आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्या २० जणांना आणि निष्पाप हिंदूंना वेठीस धरलं होतं. आज सगळे साक्षीदार खोटे निघाले आहेत.

एकूण ७ वर्ष मी कारागृहात काढली आहेत. तपास अधिकाऱ्यांना पण सांगून ठेवलं होतं की आरोपी कोण दाखवायचे आहेत. त्यांना आरोपी शोधायचे नव्हतेच. माझ्याकडे तपास दिला तर मी कदाचित शोधू शकतो की आरोपी कोण आहे.

कोर्टात आज एक ही साक्षीदाराने सांगितलं नाही की तिथे मी होतो. ते प्रामाणिक मुस्लिम आहेत. ती घटना म्हणजे एक अपघात होता पण माझ्यावर १२० कलम लावण्यात आला. राजकीय जिहाद सध्या सुरू आहे मात्र आगामी काळात भारतात हिंदू राष्ट्र ही चळवळ राबवणार आहोत असेही देसाई म्हणाले.

पुणे सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी या २० जाणांची निर्दोष मुक्तता केली आहे. २ जून २०१४ ला पुण्यातील हडपसर परिसरात पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मोहसीन शेखची जमावाने हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईंसह २३ जणांना येरवड्यातून अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT