Pune News : मोहसीन शेख खून प्रकरणी धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

संगणक अभियंता मोहसीन शेख याच्या खूनप्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाई याच्यासह न्यायालयाने २१ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
dhananjay desai
dhananjay desaisakal
Summary

संगणक अभियंता मोहसीन शेख याच्या खूनप्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाई याच्यासह न्यायालयाने २१ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

पुणे - संगणक अभियंता मोहसीन शेख याच्या खूनप्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाई याच्यासह न्यायालयाने २१ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

फेसबुकवर महापुरुषांची बदनामी झाल्यानंतर हडपसर भागात दोन जून २०१४ रोजी दंगल उसळली होती. त्यामध्ये शेख (वय २६, रा. हडपसर, मूळ. सोलापूर) याचा खून करण्यात आला होता. याबाबत मोहसीन याचा भाऊ मोबिन महम्मद सादिक शेख (वय २८) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार देसाई याच्यासह इतर २० आरोपींना अटक झाली होती.

देसाईच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा, ॲड. मिलिंद पवार आणि अ‍ॅड. अमोल काळे यांनी कामकाज पाहिले. शेख मूळचा सोलापूरचा रहिवासी होता. तो एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता. महापुरुषांची बदनामी झाल्यानंतर उफाळलेल्या दंगलीत शेख याच्यावर वार करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com