Born Baby 
पुणे

हे काय! पैशांअभावी बसथांब्यावरच झाली प्रसूती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रवासासाठी पैसे नसल्याने पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्यालगतच्या बसथांब्यावर रात्र काढलेल्या आदिवासी महिलेची पहाटेच्या सुमारास प्रसूती झाली. तिच्या अस्वस्थ पतीला पाहून भीमाशंकर कारखान्याचे कर्मचारी, ऊसतोडणी मुकादम मदतीला धावले.

हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी समाजातील गणेश विठ्ठल काळे हे पत्नी लक्ष्मी व चार वर्षांची लहान मुलगी, सहा वर्षांची पुतणी यांच्यासह शिरूर परिसरात शेतावर मोलमजुरी करत कुटुंबाची गुजराण करीत आहेत. गरोदर पत्नीचे दिवस भरत आल्याने बाळंतपणासाठी गावी जायचे तर पुरेसे पैसे नाहीत. आळेफाटा येथे असलेल्या भावाकडून पैसे घेऊन गावाकडे जायचे. यासाठी गणेश काळे दोन लहान मुली व पत्नीला घेऊन पारगाव मार्गे आळेफाट्याला शनिवारी संध्याकाळी निघाले. पारगावपर्यंत प्रवासाचे पैसे असल्याने ट्रकने पारगावला रात्री ९ वाजता पोचले. रात्र झाली अन्‌ पैसेही नाहीत, त्यामुळे येथील भीमाशंकर कारखान्याजवळील बसथांब्याच्या आसऱ्याला थांबून त्यांनी थंडीत कुडकुडत रात्र काढली.

आज पहाटे सहाच्या सुमारास महिलेला प्रसूतिकळा सुरू झाल्या आणि बसथांब्यातच तिने बाळाला जन्म दिला. या वेळी भेदरलेला पती बसथांब्याच्या बाहेर येरझारा घालत असताना ऊस मुकादम खंडू ज्ञानदेव गर्जे यांना दिसले, त्यांनी काळे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार समजला. गर्जे यांनी पत्नी मनीषा हिला मदतीला बोलावले. त्यांनी कापड इतर साहित्य आणले कारखान्याचे सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, सुरक्षा कर्मचारी अविनाश धायबर, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी तातडीने हालचाल करत १०८ नंबरला फोन करून रुग्णवाहिका बोलविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Rate: सर्वसामान्यांना पुन्हा झटका? पेट्रोल-डिझेलचे दर ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता; भाववाढीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा

New Fuel Launch: E85 इंधन आलं पण तुमच्या E20 आणि पेट्रोल गाडीचं काय होणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण

India A Squad: भारत अ संघाची घोषणा! ध्रुव जुरेलकडे मोठी जबाबदारी, 'या' युवा वेगवान गोलंदाजाची लागली लॉटरी

Transgenders Scheme: तृतीयपंथीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय, व्यवसायासाठी २ लाख मिळणार; कसा लाभ घेता येणार?

Shreyas Iyer अडीच वर्षे T20I संघातून बाहेर असूनही का झाला थेट टीम इंडियाचा कॅप्टन? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT