पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

देशातील पोलिस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवस पुण्यात होते. या परिषदेनंतर दिल्लीला जाण्यासाठी ते रवाना झाले आहेत. त्यासाठी विमानतळावर खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या आगमन बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या अंगावर एकाने घातली कार

तसेच एअर कमांडोर राहुल भसीन, लेफ्टनंट जनरल सतींदर कुमार सैनी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच जयंत येरवडेकर, धीरज घाटे, राजेश पांडे, हेमंत रासने, दीपक मिसाळ यांचीही हजेरी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi leaves for Delhi Bhujbal presence at the Pune Airport