eco friendly ganesh sakal
पुणे

पुणे : हातकागदापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

हातकागदापासून तयार केलेल्या या मूर्तींचे पाण्याच्या बादलीत विसर्जन केल्यानंतर त्या सहज विरघळून जातात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील हातकागद संस्थेतर्फे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या हेतूने ९० टक्के हातकागदाचा लगदा व १० टक्के शाडूच्या मातीपासून घडवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने घडवलेल्या या नऊ इंचांच्या मूर्तींचे वजन केवळ ५०० ग्रॅम असले तरी त्या बळकट आणि सहज हाताळण्याजोग्या आहेत.

संस्थेच्या वतीने तीन प्रकारांमध्ये या नऊ इंचांच्या मूर्ती घडवण्यात आल्या आहेत. यामध्ये पारंपरिक रंगांचा वापर करत घडवलेल्या मूर्ती, केशरी रंगातील सोनेरी डिझाइन असलेल्या मूर्ती व खास लहान मुलांना स्वत:च्या हाताने रंगविता येण्यासाठी पांढऱ्या रंगातील मूर्तींचा समावेश आहे. हातकागदापासून तयार केलेल्या या मूर्तींचे पाण्याच्या बादलीत विसर्जन केल्यानंतर त्या सहज विरघळून जातात. शिवाय पुन्हा कागद्याच्या लगद्यामध्ये रूपांतर करून त्यांचा पुनर्वापरही करता येऊ शकतो.

या मूर्तींसह पेण येथील मूर्तीकारांनी कागदाचा लगदा व शाडू मातीपासून घडवलेल्या मूर्ती शिवाजीनगर परिसरातील कृषी महाविद्यालयाला लागून असलेल्या के. बी. जोशी मार्गावरील पुणे हातकागद संस्थेच्या आवारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच संस्थेच्या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवरदेखील याबाबत माहिती उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT