ed call wrong person at adv asim sarode office 
पुणे

'ईडी'च्या कारभारावरच प्रश्नचिन्ह; पुण्यात ऍड. सरोदेंकडे आली दुसरीच व्यक्ती

सकाळ वृत्तसेवा

पुणे Pune News : पुण्यातील ख्यातनाम वकील ऍड. असीम सरोदे यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयातून (ईडी) फोन करण्यात आला होता. त्यामुळं 'ईडी'कडून ऍड. सरोदी यांची चौकशी होणार की काय या संदर्भात आज, सकाळपासून चर्चा सुरू होती. पण, सायंकाळपर्यंत एक धक्कादायक माहिती समोर आली. 'ईडी'कडून कागदपत्रे घेण्यासाठी पाठवण्यात आलेली व्यक्ती  'ईडी'ची नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ऍड. असीम सरोदे यांनी 'ईडी'च्या कारभारावरच बोट ठेवले आहे.

एकनाथ खडसे यांच्या भूखंड घोटाळ्यासंदर्भात ईडीचे अधिकारी आज खडसेंच्या विरोधात केस लढवत असलेले अंजली दमानियाचे  वकिल ऍड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात येणार होते. मात्र, ईडीनं कार्यालयीनं कर्मचाऱ्याला न पाठवता दूसऱ्याच व्यक्तीला पाठवल्याची माहिती  ऍड. असीम सरोदे यांनी मीडियाशी बोलताना दिली. कार्यालयात मीडियाचे प्रतिनिधी जमले असल्याने, संबंधित व्यक्ती कागदपत्रे न घेताच रिकाम्या हाताने परतल्याचे सरोदे यांनी सांगितले.

याबाबत ऍड. असीम सरोदे म्हणाले, 'ईडी'नं कार्यालयानं अधिकारी न पाठवता दूसऱ्याच व्यक्तीला कागदपत्रे घेण्यासाठी पाठवलं. 'ईडी'सारख्या संस्थेनं अशा व्यक्तीला कागदपत्र घेण्यासाठी पाठवणं किती योग्य आहे? मी अधिकारी नाही मी फक्त कागदपत्र घ्यायला आलोय, असं आलेल्या कर्मचाऱ्यानचं सांगितलं. या विरोधात 'ईडी'च्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे.' 'ईडी'नं नियमानुसार काम करायला हवं. आज झालं ते बेजबाबदारपणे केलेलं काम होतं. कागदपत्रांच्या झेरॉक्सचे पैसे 'ईडी'कडून घेणार, असेही ऍड. सरोदे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT