protest sakal
पुणे

ठाण्यातील घटनेवरून बारामतीत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा आज निषेध केला.

मिलिंद संगई, बारामती

बारामती - अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा आज बारामती नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचांऱ्यांनी निषेध करत काम बंद आंदोलन केले.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. निवेदनात नमूद केले आहे की, हातगाडी फेरीवाला असलेल्या अमरजीत यादव याने हत्याराने हल्ला करुन जखमी केले ही घटना गंभीर असून निंदनीय आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यावर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर प्रशासनाचे धैर्य खच्ची होते. महिला अधिकाऱ्यावर होणारा हल्ला ही बाब चिंताजनक असून बारामती नगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी याचा निषेध करत आहेत.

कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या दारात येत या प्रकाराचा निषेध नोंदविला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनाही हे निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कच्चे तेल महागले; आता पेट्रोल-डिझेल कितीला? महाराष्ट्रातील शहरनिहाय नवे दर जाहीर

Shaktipeeth Highway Drone Survey : ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी विठ्यात ‘ड्रोन सर्व्हे’, शेतकऱ्यांनी प्रशासनाला दाखवला हिसका; सांगलीत वातावरण तापलं

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' प्रशासक नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज सुनावणी

Pakistan Occupied Kashmir: पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणाव शिगेला; धुमश्‍चक्रीत ११ जणांचा मृत्यू, ब्रिटिश खासदारांकडून चिंता व्यक्त

Maharashtra Education : चौथीच्या पुस्तकात मोठा बदल! छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच जोडले 'हे' खास पान; संत, थोर समाजपुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना होणार ओळख

SCROLL FOR NEXT