पुणे

खेड-शिवापूर टोल नाक्यावर मात्र बनावट टोल पावतीचे रॅकेट

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : एकीकडे टोल नाक्यावर फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली बंधनकारक करण्यात आली असताना दुसरीकडे खेड-शिवापूर टोल नाक्यावर मात्र बनावट टोल पावतीचे रॅकेट उघडकीस आले आहे. राजगड पोलिसांनी याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे असून त्यांना अटक केली आहे. मात्र यानिमित्ताने आपण भरत असलेल्या टोलचा पैसा नक्की कोणाच्या खिशात जातो? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुदेश प्रकाश गंगावणे (वय 25 वर्षे रा. वाई धोम कॉलनी तालुका वाई जिल्हा सातारा, अक्षय तानाजी सणस (वय 22 वर्षे रा. वाई नागेवाडी तालुका वाई जिल्हा सातारा, शुभम सिताराम डोलारे (वय 19 वर्षे रा. जनता वसाहत पुणे, साई लादूराम सुतार (वय 25 वर्षे रा. दत्तनगर कात्रज पुणे, हेमंत भाटे 6) दादा दळवी 7) सतीश मरगजे यांच्यावर  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अभिजित वसंत बाबर यांनी राजगड पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. अभिजित बाबर यांनी 16 फेब्रुवारी रोजी साताऱ्याला जाताना खेड-शिवापूर टोलनाका आणि आणेवाडी टोलनाक्यावर टोलचे पैसे भरून पावती घेतली. मात्र खेड-शिवापूर आणि आणेवाडी या दोन्ही टोलनाक्यावरील पावत्यांमध्ये तफावत असल्याने त्या पावत्या बनावट असल्याचे दिसून आले.

त्यानुसार त्यांनी सदर प्रकार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना सांगितला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाबर यांच्यासोबत खेड-शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावर पंच घेऊन जाऊन सत्यता पडताळणी केली. त्यात त्या पावत्या बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर बाबर यांनी राजगड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी वरील सात जणांवर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक निखिल मगदूम पुढील तपास करत आहेत. 

याबाबत पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर म्हणाले, "खेड-शिवापूर टोलनाका हा भ्रष्टाचाराचे कुरण झाला आहे. सदर बनावट टोल पावत्या प्रकरणाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे सातारा टोल रोड कंपनी दुर्लक्ष करत आहे. यावरून ही सर्व मिलीभगत असल्याची शंका येते आहे. खेड-शिवापूर टोल नाक्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे."

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजप मंदिर लुटारूंसोबत की रामरक्षकांसोबत? नागपूरमध्ये उद्धव ठाकरे गरजले...

Rajapur Waterfalls : पावसाळा सुरू होताच राजापुरातील धबधबे ओसंडले; 'या' 5 धबधब्यांचे सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल गांधींची पहिली पोस्ट; नेमकं काय म्हटलं?

ITI विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय, उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा

Pune News : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

SCROLL FOR NEXT