esakal | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या : चित्रा वाघ

बोलून बातमी शोधा

Pooja Chavan death case Pune police suspicious investigation Chitra Wagh}

पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये महाआघाडीतील एका मंत्र्याचे नाव जोडले गेल्याने त्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकीय आरोपांच्या फैरी झडल्या.

pune
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या : चित्रा वाघ
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली.  ''लेखी तक्रार नसल्यामुळे एफआयआर दाखल केली नाही'' अशी माहिती पोलिसांनी सांगितल्यावर चित्रा वाघ पोलीस निरीक्षक यांच्यावर संतप्त झाल्या आहेत. सतंप्त चित्रा वाघ यांनी ''पुणे पोलिसांकडून तपास काढून घ्यावा'' अशी मागणी केली आहे.   

पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये महाआघाडीतील एका मंत्र्याचे नाव जोडले गेल्याने त्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकीय आरोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान या प्रकरणातील तपासाबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वानवडी येथील घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर वानवडी पोलिस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल केलेली नसल्यामुळे त्या संतप्त झाल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

''पुणे पोलिसांवर सरकारचा दबाव टाकला जात आहे. महाराष्ट्र जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे'' असा आरोपही त्यांनी यावेळी केली आहे. ''पहिल्या दिवसापासून पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पूजा मृत्यू प्रकरणी प्रत्यक्षदर्शींना सोडून दिले. एफआयर दाखल केलेली नाही. त्यामुळे पुणे पोलिसांकडून तपास काढून घेतला पाहिजे. महाराष्ट्रातील एखाद्या सक्षम अधिकाऱ्याला हा तपास द्या. आता मुख्यमंत्र्यानीच पुणे पोलिसांना विचारावं की, ते कोणाच्या आदेशाची वाट पाहतायेत'' अशा शब्दात त्यांनी पुणे पोलिसांच्या कामावर टिका केली.


पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांना वारंवार व्हिडीओ आणि फोनद्वारे धमक्या येत असल्याची माहितीप्रविण दरेकर यांनी दिली. याबाबत पोलीस महासंचालकांच्या माहिती दिली  असून याप्रकरणी देखील तातडीने कारवाई करावी असी मागणीही त्यांनी केली होती.

पुणे विद्यापीठाने दोन्‍ही सत्रांच्या परीक्षा एकत्र घ्याव्यात; कुलगुरूंकडे मागणी