पुणे

दशक्रिया विधीची गर्दी टाळण्याची गरज, अन्यथा...

राजेंद्र मारणे

भुकूम : कोरोनामुळे अंतविधी, दशक्रिया, तेरावा विधीसाठी गर्दी करू नये यासाठी आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान सध्या दशक्रिया विधीला प्रवचन ठेवून दोन तिनशे लोक जमत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भिती आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मुळशी तालुक्यातील मोठ्या गावातून दररोज कोरोना रूग्ण सापडत आहेत. तसेच पश्चिम भागातील लहान गावातही रूग्ण सापडले आहेत. तालुक्यातील कोरोना रूग्णसंख्या 2277 पर्यंत पोहचली असून, 64 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अशा परिस्थितीत दशक्रिया विधीला प्रवचन ठेवून गर्दी होत असल्याने धोका अधिक वाढत आहे. घरातील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे दशक्रिया विधीस तालुक्यातील व नातेवाईक सर्वांनी यावे अशी अपेक्षा धरली जाते. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील शेवटचे कार्य तसेच दशक्रिया विधीस मोठी गर्दी म्हणजे मोठेपण ही भावना जपली जात आहे.

दरम्यान, त्यामुळे तालुक्यातील मान्यवरांना, परिसरातील ग्रामस्थांना व नातेवाईकांना फोन करून आवर्जून उपस्थितीचे निमंत्रण दिले जाऊ लागले आहे. फोन आल्यामुळे उपस्थित राहण्याची गरज आहे म्हणून अनेकजण हजेरी लावत आहे. त्यातच प्रवचन ठेवून भाषणे होऊ लागले आहेत. कोरोनाचा धोका कायम आहे.

प्रशासन,  प्रसिध्दी माध्यमातून आवाहन करण्यात येत असले तरी लोक ऐकत नाहीत. त्यातच मास्क न वापरणे, सो़शल डिस्टन्सिंग न ठेवणे असे प्रकार होत आहेत. आत्तापर्यंत धार्मिक विधींसाठी नियम पाळत होते. दरम्यान तालुक्यातील मोठ्या गावातून कार्यक्रमाचे असे प्रकार सुरू झाले आहेत.  अशा व्यक्तींवर काही कार्यवाही करण्याची निश्चित गरज आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT