पुणे

PMPML : खंडित बससेवेमुळे आर्थिक भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : एसी नकोत, फक्त शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेळेवर पोचता येईल, अशा बस द्या, असे सिंहगड(Sinhgad), पानशेत(panshet), खडकवासला (khadkwasla) परिसरातील पीएमपीच्या (Pmpml) प्रवाशांचे म्हणणे आहे. खंडित बससेवा न देता सलग बस सेवा दिल्यास, वाढलेला आर्थिक भुर्दंड कमी होईल आणि वेळही वाचेल, असेही त्यांचे म्हणणे आहे.

पीएमपीने लांब पल्ल्याचे अनेक मार्ग खंडित केले आहेत. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांना स्वारगेटला उतरून दुसऱ्या बसने पुढील प्रवास करावा लागतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असून प्रवासाचा वेळही वाढत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे पीएमपीने पूर्ववत बससेवा सुरू करावी, असेही त्यांचे म्हणणे आहे. वडगाव, सनसिटी, धायरी गाव, डीएसके विश्व, नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी मार्गे नांदोशी-सणसनगर, खडकवासला, आतकरवाडी(सिंहगड), खानापूर, वरदाडे, नव्याने सुरू करण्यात आलेली रांजणे-खामगाव व पानशेत या गावांसाठी असलेल्या बसच्या फेऱ्या ५० ते ६० टक्क्यांहून अधिक कमी केल्याने प्रवाशांना ये-जा करताना गैरसोय होत आहे.

प्रवासी म्हणतात...

डीएसके विश्व ते पुणे स्टेशन व मंडईला जाण्यासाठी बससेवा पूर्ववत सुरू करावी. डीएसके ते आनंदनगर ही शटल सेवाही सुरू करावी. चालक व वाहकांकडून वेळापत्रकाचे पालन होईल, याकडे पीएमपी प्रशासनाने लक्ष द्यावे.

- दामोदर जोशी, ज्येष्ठ नागरिक, डीएसके विश्व, धायरी

अगोदर शिवाजीनगर, कात्रज, मंडई, पुणे स्टेशन अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी सिंहगड रस्त्यावरून सहज बस मिळायच्या. अनेक ठिकाणची बससेवा बंद असल्याने सध्या मात्र गैरसोय होत आहे.

- प्रज्ञा धोत्रीकर, ज्येष्ठ महिला प्रवासी, कोल्हेवाडी, खडकवासला

सध्या येथे दोन तासांनी बस मिळते. त्यामुळे जीव धोक्यात घालून अवजड डंपरने ये-जा करावी लागते. आम्हाला एसी बस नको; पण आहे ती बस वेळेवर उपलब्ध व्हावी.

- कावेरी राहुल कोंढाळकर, विद्यार्थिनी, सणसनगर

ग्रामीण भागातील खानापूर, रांजणे, पानशेत या गावांसाठी सध्या बससेवा सुरू आहे. बसच्या फेऱ्या वाढवल्या तर गर्दी नियंत्रणात राहील व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे शक्य होईल.

- नीलेश जावळकर, माजी सरपंच, खानापूर

बसमध्ये अनेक प्रवासी मास्क वापरत नाहीत. त्याबाबत नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सध्या बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बसच्या फेऱ्या वाढवाव्यात व उभ्याने प्रवास करायला बंदी असावी.

- शिवानी विजय कुरवले, विद्यार्थिनी, गोऱ्हे बुद्रुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT