पर्यावरणासाठी ‘ऊर्जा’ वापरू

राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संचालकपदाची सूत्रे स्वीकारलेले डॉ. आशिष लेले यांची मुलाखत.
file photo
file photosakal

कोरोना साथीच्या संकटकाळात देशाने आत्मनिर्भरतेची कास धरली आहे. उद्योग, तंत्रज्ञान, वैद्यकीय आदी क्षेत्रांत स्वयंपूर्ण होण्यासाठी रसायनांचे महत्त्व सर्वश्रुत आहे. त्यासंदर्भात राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संचालकपदाची सूत्रे स्वीकारलेले डॉ. आशिष लेले यांची मुलाखत.

प्रश्न : देशातील उद्योगविश्वाला दिशा देणाऱ्या रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे तुम्ही संचालक आहात. या जबाबदारीकडे तुम्ही कसे पाहता?

डॉ. आशिष लेले : रसायनशास्त्र आणि रसायन अभियांत्रिकी क्षेत्रातील देशातीलच नव्हे, तर जगातील एक ‘प्रिमीयर इन्स्टिट्यूट’ म्हणून ‘एनसीएल’कडे पाहिले जाते. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक दशकात देशात रसायन क्षेत्रातील नवीन उद्योगसाखळी कशी उभी राहील, यासाठी आम्ही प्रयत्न केले आहे. म्हणूनच आज जनरीक फार्मा, कृषी औषधे, रंग, उत्प्रेरक आदी क्षेत्रे भारतात मोठी झाली आहेत.

file photo
पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

तुमच्या आयुष्याच्या वळणावर ‘एनसीएल’चा पत्ता कसा मिळाला?

अमेरिकेतील रसायन अभियांत्रिकीचे मुख्य केंद्र असलेल्या डेलावर शहरातील विद्यापीठात माझी पीएच.डी. झाली. यादरम्यान ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर डेलावरला आले होते. तेव्हा ते ‘एनसीएल’च्या रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख होते. पीएच.डी.नंतर भारतात परतण्याचा माझा मनसुबा मी त्यांना सांगितला. मला प्रोत्साहन देत ते म्हणाले, ‘तू पीएच.डी. पूर्ण होण्याआधी सहा महिने आम्हाला कळव.’ पुढे पात्रतेसाठी आवश्यक परीक्षांची पूर्तता करत मी ‘एनसीएल’मध्ये दाखल झालो. मला नुसतं शिकवायचं नव्हतं, तर उद्योगपूरक संशोधन करायचे होते. उद्योगांमध्ये भविष्यकालीन मूलभूत संशोधनासाठी स्वातंत्र्य मिळत नाही. त्यामुळे ‘एनसीएल’ हा एक उत्तम पर्याय होता, याचे कारण तेथे फक्त शैक्षणिक नव्हे तर औद्योगिक संशोधनाला वाव आहे. ज्याला आम्ही ‘एंड टू एंड’ रिसर्च असे म्हणतो. मी १९९३ मध्ये इथे आलो.

file photo
आरोग्य सेवकांना हवाय लशीचा बूस्टर डोस

कोरोना विरुद्धच्या लढाईत ‘एनसीएल’चा सहभाग कसा होता?

कोरोनाबाधितांसाठी सुरवातीच्या टप्प्यात पॅरासिटेमॉलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. यासाठी ‘एनसीएल’ने प्रक्रिया तंत्रज्ञानाची नवी पद्धत विकसिते केली. त्याचे लायसन्सदेखील घेतले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या (सीएसआयआर) सर्व प्रयोगशाळांमध्ये ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट (एपीआय) विकसित करण्याचे संशोधन सुरू आहे. त्यात एनसीएलचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. मैला पाण्यातून कोरोनाचा प्रसार शोधण्यासंबंधी एनसीएलने संशोधन केले. मैला पाण्यातून व्हायरल लोड आणि कोविडचा व्हेरियंट शोधता येतो. पीपीई किट, मास्क आदींसाठी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर कोरोनाकाळात झाला. या जैववैद्यकीय कचऱ्याच्या पुणर्वापरातून उपयुक्त गोष्टी बनविण्याचे तंत्रज्ञान एनसीएलने विकसित केले आहे. ऑक्सिजन संवर्धक यंत्रासाठी लागणारे झिओलाइट, नसल स्वाब, मास्क आदींच्या निर्मितीचे तंत्रज्ञान एनसीएलने विकसित केले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील कोरोनाच्या जनकुयी क्रमनिर्धारणाच्या कार्यक्रमातही आम्ही सहभागी आहोत. राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांवर ऑक्सिजनची गुणवत्ता तपासण्याचे काम आम्ही केले.

file photo
चंद्र आहे ‘साक्षी’ला!

‘एनसीएल’समोरची आव्हाने कोणती? येत्या दशकातील तुमचे योगदान काय असेल?

देशातील उद्योगांसांठी लागणारी रसायने आणि कच्च्या मालाच्या बाबतीत आपण परावलंबी आहोत. ऊर्जेच्या बाबतीत तर आपण ९० टक्के आयातीवर अवलंबून आहोत. सौरविद्युत प्रकल्पासाठीचे लागणारे पदार्थही आपल्या देशात बनत नाहीत. या बाबतीत आत्मनिर्भर बनण्याबरोबरच अशी उत्पादने जागतिक बाजारपेठेत टिकतील, असे प्रयत्नही करावे लागतील. जगासमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान आहे. आत्ताच्या पिढीला हातात पुढील दोन-तीन पिढ्यांचे केवळ भवितव्य नाही, तर त्यांनी शाश्वत वातावरणात जगायचे का नाही, याचे उत्तरही आहे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी संपूर्ण राष्ट्राची आहे. त्यामुळे येत्या काळात स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलावर आम्ही काम करणार आहोत. प्लास्टिक, ई-वेस्ट, बॅटरी आदींच्या पुनर्वापरासंदर्भात, तसेच जैवकचऱ्यावरही आम्ही या दशकात संशोधन करणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com