पुणे

ओतूरला मोबाइल टॉवरला आग, जीवितहानी नाही

पराग जगताप

ओतूर(जुन्नर) : येथील शनिमंदिरा जवळ येथे अशोक काशिद( गुरूजी) यांच्या इमारतीवर बसवलेल्या मोबाइल कंपनीच्या टॉवरला शुक्रवारी सायंकाळी मोठी आग लागली. यात मोबाइल टॉवरची संपूर्ण यंत्रणा जळून खाक झाली आहे. आगीचा प्रकार लवकर निदर्शनास आल्यामुळे या इमारतील सर्व नागरिक वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.आग लागल्याची घटना समजताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशूराम कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच आग शमविण्यासाठी जुन्नर नगरपरिषदेच्या पाण्याच्या बंबास प्राचारण करण्यात आले.

उंच इमारतीवरील टॉवरला लागलेल्या आगीचे उंच उंच लोळ उठल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. तसेच नागरिकांनामध्ये भितीचे वातावरण होते. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. जुन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमक बंब आल्यावर आग आटोक्यात आली. मात्र, प्रशासनाकडून विविध प्रकारच्या मोबाइल टॉवरला भरवस्तीतील इमारतीवर परवानगी देऊन त्या परीसरातील नागरिकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळच खेळला जात आहे.

ओतूर व परिसरात अनेकदा आगीच्या मोठमोठ्या घटना घडल्या असून त्यात आर्थिक नुकसान बरोबरच कित्येकदा जीवितहानीही झाली आहे. ओतूरचे वाढते शहरीकरण व काल सायंकाळी मोबाइल टॉवरला भरवस्ती लागलेल्या आगीची घटना पाहता ओतूर ग्रामपंचायतींने स्व-मालकीचा अग्नीशामक बंब घ्यावा अशी मागणी ओतूरचे माजी सरपंंच व विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे यांनी केली आहे.

''जुन्नर तालुक्यात शेकडो मोबाइल टॉवर असून यामध्ये कित्येक टॉवर अनाधिकृत आहे. जे अधिकृत आहे. त्याचा ही कोट्यावधीचा महसूल थकीत आहे. ओतूर ग्रामपंचायतीचा वीस लाखांपेक्षा जास्त महसूल मोबाइल टॉवर कंपन्याकडे थकीत आहे. प्रशासकीय पातळीवर दखल घेवून युध्द पातळीवर महसूल वसूल करावा अन्यथा टॉवर बंदची कारवाई करावी तसेच कालची घटना पाहता तालुक्यातील सर्व मोबाइल टॉवरचे प्रशासकीय पातळीवर फायर ऑडीट करावे'' अशी मागणी जुन्नर तालुक्यात भाजपा अध्यक्ष व ओतूरचे माजी सरपंच संतोष तांबे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6,00,00,00,000 इतकी आहे विजय थलापतीची संपत्ती! 27 वर्षांच्या संसारानंतर बायकोला किती मिळणार पोटगी?

ST Smart Card: प्रगतीचा डिजिटल मार्ग! ‘स्मार्ट कार्ड’साठी आठवडाभरात लाखो प्रवाशांची नोंदणी

Latest Marathi News Live Update : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत वायू गळती, पोलीस तपास सुरु

Iran Missile Production: इराण रोज किती मिसाईल्स बनवतो? अमेरिका, इस्रायला का आहे भीती?

Mumbai: मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार, डालखिचडीमध्ये आढळलं झुरळ; अन्नसुरक्षेचा धक्का!

SCROLL FOR NEXT