पुणे

पुणे - नांदेड फाट्याजवळ कंपनीत आग, एकाचा मृत्यू

निलेश बोरुडे

सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भाऊ इंडस्ट्रीज इस्टेट या कंपनीला भीषण आग लागली आहे.

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भाऊ इंडस्ट्रीज इस्टेट या कंपनीला भीषण आग लागली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून अग्निशमन दलाच्या जवानांनी एक मृतदेह बाहेर काढला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती असून ३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन केंद्रप्रमुख सुजित पाटील यांच्यासह 17 जवान व पुणे महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, सदर कंपनी केक वरील शोभेची दारू बनविण्याची असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली असून हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी गर्दी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT