esakal | मित्राच्या छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

SUICIDE

मित्राच्या छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : हप्ते फेडण्यासाठी मित्राकडून घेतलेल्या पाच लाखांवर दर महिन्याला तब्बल १० टक्के व्याज आणि त्याच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तरूणाने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली.

सचिन सुरेश काळभोर (वय ४०, रा. पिसोळी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुहास ननावरे (रा. धायरी) याच्याविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामिनी सचिन काळभोर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कामिनी पती-पत्नी असून, त्यांनी काही वर्षांपूर्वी फ्लॅट घेतला होता. त्याचे शेवटचे हप्ते भरून, कर्ज कमी करण्यासाठी सचिन यांनी मित्र सुहास ननावरे यांच्याकडून पाच लाख रूपये व्याजाने घेतले होते.

व्याजापोटी सचिन दर महिन्याला सुहासला तब्बल १० टक्के दराने ५० हजार रूपये देत होता. काही दिवसानंतर सुहासने सचिनला दिलेले पाच लाख रूपये मागण्याचा तगादा लावला होता. पंरतु, पैसे नसल्यामुळे सचिन त्याला महिन्याला ५० हजारांचे व्याज देत होता. दिलेली रक्कम परत पाहिजे, या कारणासाठी सुहास हा सचिन यांना शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून सचिनने गळफास घेऊन आत्महत्या केली.

loading image
go to top