पुणे : राज्य सरकारने जाहीर करूनही रिक्षाचालकांना अद्याप अनुदान मिळालेले नाही, त्याचा खासदार गिरीश बापट (girish bapat) यांनी अभिनव पद्धतीने बुधवारी निषेध केला. खासदारपदाच्या मानधनातून (MP fund) बापट यांनी १९ रिक्षासंघटनांच्या ३८० प्रतिनिधींना प्रत्येकी १५०० रुपयांचे रोख वाटप केले. तसेच रिक्षाचालकांसाठी गुरुवारी सकाळी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) आंदोलनही करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. (girish bapat helps 380 rickshaw pullers from MP fund)
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडॉऊनमुळे रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यासाठी त्यांना आधार म्हणून प्रत्येकी १५०० रुपयांचे वाटप करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने एक महिन्यांपूर्वी केली होती. परंतु, रिक्षाचालकांना अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. रिक्षा संघटनाही या बाबत वारंवार पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अनुदान देण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालय संगणक प्रणाली तयारी करीत आहेत. त्यानंतर त्याचे वाटप होईल, असे सांगण्यात येत आहे. खासदार बापट यांनीही या बाबत पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत रिक्षाचालक संघटनांची नुकतीच बैठक घेतली होती. परंतु, त्यातूनही अनुदान नेमके केव्हा मिळणार, हे निश्चित झाले नाही.
या पार्श्वभूमीवर खासदार बापट म्हणाले ‘'राज्य सरकारने रिक्षाचालकांसाठी सुमारे १८० कोटी अनुदान जाहीर केले. परंतु अद्याप त्याचे वाटप झालेले नाही. पालकमंत्र्यांच्या बैठकीत वारंवार या बाबत विचारणा करूनही उपयोग झालेला नाही. राज्य सरकारने रिक्षाचालकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे नाईलाजाने आंदोलन करावे लागत आहे.’’ प्रसंगी नगरसेवक उमेश गायकवाड, माजी नगरसेवक उज्वल केसकर, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बापू मानकर, प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापुरकर आदी उपस्थित होते. या वेळी खालील रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना मदत देण्यात आली.
१) पुणे शहर ऑटोरिक्षा फेडरेशन, २) महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, ३) विद्यार्थी वाहतूक संघटना, ४) सावकाश रिक्षा संघ, ५) मनाली ऑटो रिक्षा संघटना, ६) महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ७) राष्ट्रवादी रिक्षा संघटना, ८) पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना, ९) क्रांतिवीर रिक्षा संघटना, १०) सत्यसेवा वाहतूक संघ पुणे, ११) आम आदमी रिक्षा चालक संघटना, १२) एआयएमआयएम पुणे रिक्षा संघटना, १३) भाजपा वाहतूक आघाडी, १४) पीएस अमर ऑटो रिक्षा संघटना, १५) फडके हौद रिक्षा संघटना, १६) रिक्षा परिषद, १७) भारतीय दलित कोब्रा रिक्षा संघटना, १८) रिक्षा ब्रिगेड १९) महाराष्ट्र रिक्षा सेना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.