Akashwani Pune 
पुणे

Pune Akashwani : पुणे आकाशवाणीवरील बातमीपत्र सुरुच राहणार! अनुराग ठाकुरांचे नवे आदेश

पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचं युनिट छत्रपती संभाजीनगर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Akashvani Pune: पुणेकरांसाठी आता ही खूशखबर आहे. कारण पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या बातम्यांची निर्मिती आणि प्रसारण छत्रपती संभाजीनगरला हालवण्याचा निर्णय केंद्रीय प्रसारण मंत्रालयानं स्थगित केला आहे. त्यामुळं पूर्वीप्रमाणेच पुणे आकाशवाणीवरुनच बातम्या प्रसारित होतील, असे नवे आदेश मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले आहेत. (Good news News bulletin on Pune Akashvani will continue Minister Anurag Thakur new order)

प्रसार भारतीनं काढलेल्या नव्या आदेशाात तीन बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, १३ जून २०२३ रोजी काढलेल्या आदेशानुसार आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन सकाळी ७.१० वाजता, ८.०० वाजता होणारे दोन बुलेटिन. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता आणि १०.५८ वाजता एफएमवरुन होणारं बुलेटिन तसेच संध्याकाळी ६.०० वाजता होणारं (जिल्हा बातमीपत्र) यांची निर्मिती आणि प्रसारण पुढील आदेश येईपर्यंत पुणे केंद्रावरुनच होईल. (Marathi Tajya Batmya)

त्याचबरोबर पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील नियमित, कंत्राटी आणि हंगामी कर्मचाऱ्यांचं कामही पुढील आदेश येईपर्यंत कायम राहिल असंही या नव्या आदेशात म्हटलं आहे. वृत्त विभागाच्या महासंचालकांच्या मंजुरीनंतर हे आदेश काढण्यात आल्याचं प्रसार भारतीच्या पत्रात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी अनुराग ठाकूर यांच्याकडं पत्राद्वारे केली होती.

पुणे सांस्कृतीक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचं शहर असल्यानं याबाबतच्या बातम्यांना न्याय मिळायला हवा. पण पुण्यातून बातमीपत्र बंद झाल्यास असा न्याय मिळू शकणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDAच्या अधिकाऱ्यांनी केला कोट्यवधींचा घोटाळा, ५ जणांवर निलंबनाची कारवाई; मंत्री झिरवाळांनी दिली माहिती

जॅक मॅकगर्कची १४ चेंडूंत फिफ्टी अन् १९ चेंडूंत ९६ धावा; वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात वाचला

Sugarcane Price Protest ₹5,500 Per Tonne : साखर कारखान्यांची कोंडी! ऊसदर आंदोलनाची धग दारावर; शेतकरी संघटना साडेपाच हजारांवर ठाम

Navratri Day 7: नवरात्रीच्या सातव्या दिवशी अशी करा माता कालरात्रीची पूजा! जाणून घ्या मंत्र, नैवेद्य, देवीचे स्वरूप अन् महत्व...

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; भूजल पातळीत अडीच ते साडेतीन मीटरची घट

SCROLL FOR NEXT