Avtar Singh Khanda
Avtar Singh Khanda

Avtar Singh Khanda : युके हायकमिशनवरील तिरंगा खाली खेचणाऱ्या खलिस्तानवाद्याचा मृत्यू!

बॉम्ब एक्सपर्ट असलेला खांडा हा अमृतपालसिंगचा होता खास सहकारी होता.

युकेमधील खलिस्तानी लिबरेशन फोर्सचा (KLF) प्रमुख आणि भारतासाठी वॉन्टेड असलेला खलिस्तानी फुटिरतावादी नेता अमृतपाल सिंग याचा मुख्य सहकारी असलेला अवतार सिंग खांडा याचा मृत्यू झाला आहे. यानं अमृतपाल सिंगला मार्च-एप्रिल महिन्यात ३७ दिवस पोलिसांपासून लपवून ठेवलं होतं. (Separatist Amritpal Singh handler Khalistani leader Avtar Singh Khanda dies in UK)

Avtar Singh Khanda
Video : दिल्लीच्या मुखर्जीनगर भागात इमारतीला आग! कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी खिडकीतून टाकल्या उड्या

अवतारसिंग खांडा याचा मृत्यू विषबाधा झाल्यानं झाल्याचा संशय होता. पण सूत्रांच्या माहितीनुसार, वैद्यकीय नोंदींनुसार तो ब्लड कॅन्सरनं ग्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. यावरील उपचारांसाठी त्याला बर्मिंगहॅम येथील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या ठिकाणीच उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

Avtar Singh Khanda
Eknath Shinde : "ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही"; जाहिरात वादानंतर शिंदे-फडणवीस एकत्र!

खांडा हे एक बॉम्ब एक्सपर्ट आहेत, तसेच १९ मार्च रोजी लंडनमधील युके हायकमिशनवरील भारताचा राष्ट्रध्वज खाली खेचल्याप्रकरणाचा तो मास्टरमाईंड होता. राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) या घटनेशी संबंधित मुख्य आरोपी म्हणून खांदा आणि इतर तीन फुटीरतावाद्यांची ओळख पटवली होती. (Marathi Tajya Batmya)

Avtar Singh Khanda
Pune Accident: तेल टँकर अपघातानंतर प्रशासनाची मूठमाती, नगर हायवेवर ट्रॅफिकचा बोजवारा

केएलएफ दहशतवादी कुलवंत सिंग यांचा खांडा हा मुलगा होता. तो सन २००७ मध्ये युकेमध्ये उच्चशिक्षणासाठी गेला होता. त्यानंतर तो २०१२ मध्ये खलिस्तानी चळवळीत सामिल झाला. खांडा हा केएलएफमध्ये रंजोध सिंह या नावानं वावरत होता. त्यानंचं अमृतपाल सिंग याला वारीस पंजाबचा प्रमुख बनवण्यात मुख्य भूमिका बाजावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com