ncp 
पुणे

पुणे जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी जुगलबंदी पुन्हा रंगणार?

राजेंद्र सांडभोर

राजगुरुनगर : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावाला, मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश एस. सी. गुप्ते आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती पोखरकर यांच्या विरोधात ३१ मे रोजी अविश्वास ठराव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाल्याचे पीठासीन अधिकारी असलेले खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घोषित केले होते. त्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार व शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती दिली व पुढील सुनावणी २६ जून रोजी होणार असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. रोहन होगले यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनीच ही माहिती दिली.

अविश्वास ठरावानंतर नवीन सभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठरावाच्या बाजूने मतदान केलेले बहुतांश पंचायत समिती सदस्य, नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सहलीला गेलेले आहेत. या स्थगितीच्या निर्णयामुळे आता त्यांचा मुक्काम वाढणार की ते सहलीवरुन परत येणार याबाबतही लोकांना उत्सुकता आहे.

सभापती पोखरकर यांच्यावर २४ मे रोजी, शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंड करीत अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ आणि भाजपच्या एकमेव सदस्य, विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर ठरावाचे समर्थक सदस्य सहलीला गेले होते. दरम्यान ते पुण्याजवळ ज्या रिसॉर्टवर थांबले होते, त्याची माहिती पोखरकर व समर्थकांना मिळाली. त्यानुसार ते समर्थकांसह त्याठिकाणी गेले व राडा केला. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या राजकारणाला हिंसक वळण लागले व त्यांना अटकही झाली. त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपांची धुळवड रंगली. राष्ट्रवादीच्या बाजूने आमदार दिलीप मोहिते व शिवसेनेच्या बाजूने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वाग्युद्ध पेटले होते. त्यानंतर ३१ मे रोजी, शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंडखोरी केल्याने, पोखरकरांवरील अविश्वास ठराव सहज मंजूर झाला. शिवसेनेचे बहुमत असतानादेखील, शिवसेनेच्याच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आणि यामागे आमदार मोहिते यांचा हात असल्याच्या संशयावरून शिवसेना चिडली. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राजगुरूनगर येथे येऊन आमदार मोहितेंवर थेट शरसंधान केले. आमदारांनीही त्यांना उपहासात्मक प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा वाद पेटलेला असतानाच आता अविश्वास ठरावाच्या मंजुरीला स्थगिती मिळाल्याने या विषयाला वेगळेच वळण मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT