पुणे जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या प्रवास भत्त्यात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या प्रवास भत्त्यात वाढ

पुणे जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या प्रवास भत्त्यात वाढ

पुणे : राज्य सरकारने राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या दरमहा प्रवास भत्त्यात प्रत्येकी चारशे रुपयांची वाढ केली आहे. यामुळे ग्रामसेवकांना आता दरमहा दीड हजार रुपये प्रवास भत्त्यापोटी मिळणार आहेत. सध्या ही रक्कम दरमहा १ हजार १०० रुपये इतकी होती. या निर्णयाचा पुणे जिल्ह्यातील सुमारे ९०० ग्रामसेवकांना फायदा होणार आहे. या निर्णयाने तब्बल नऊ वर्षांच्या खंडानंतर ग्रामसेवकांच्या प्रवास भत्त्यात वाढ झाली आहे. याआधी १ जानेवारी २०१२ ला वाढ केली होती. यावाढीनंतर आतापर्यंत दरमहा अकराशे रुपये भत्ता मिळत होता, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी आज सांगितले.

हेही वाचा: वेदिका शिंदेच्या इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ

सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर प्रवास भत्त्यात वाढकरण्याची मागणी ग्रामसेवक संघटनांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडेकेली होती. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. त्यामुळे ते केंद्र व राज्य सरकार आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या स्वउत्पन्नाच्या निधीच्या योजनांची अंमलबजावणी गाव पातळीवर करत असतात. याशिवाय सरकारचे महत्वकांक्षी प्रकल्प, विविध अभियाने राबविण्याची जबाबदारीही ते पार पाडत असतात. तसेच विविध योजनांचे प्रस्ताव तयार करणे, कृती आराखडे तयार करून ते वरिष्ठ कार्यालयाला पाठविणे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आदी ठिकाणच्या विविध बैठकांना ग्रामसेवक उपस्थित राहत असतात.

हेही वाचा: 15 जुलैच्या आसपास दहावीचा निकाल लागणार; बोर्डाची माहिती

याशिवाय त्यांना दिवाबत्ती पाणीपुरवठा साहित्य, आरोग्याशी संबंधित साहित्य आणि बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी अनेकदा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून हा प्रवास भत्ता वाढविण्यात आल्याचे ग्रामविकासखात्याने जिल्हा परिषदांना पाठविलेल्या अध्यादेशात नमूद केले आहे.

Web Title: Increase In Travel Allowance Of Gram Sevaks In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top